सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (16:21 IST)

Lungs Health:जास्त सिगारेट ओढणाऱ्यांची फुफ्फुसे राहतील निरोगी, आहारात या पदार्थांचा करा समावेश

smoking lungs
सकस आहाराच्या मदतीने तुम्ही तुमच्या फुफ्फुसांना दीर्घकाळ निरोगी ठेवू शकता. भारताविषयी बोलायचे झाले तर, येथे वायू प्रदूषण आणि धूम्रपानाच्या वाढत्या घटनांमुळे फुफ्फुसांशी संबंधित समस्यांना खूप सामोरे जावे लागते. त्यामुळे तुम्हाला तुमची फुफ्फुस निरोगी ठेवायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करणे गरजेचे आहे.  
 
अक्रोड - अमेरिकन कॉलेज ऑफ न्यूट्रिशनमधून प्रकाशित झालेल्या जर्नलनुसार, अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते. रोज मूठभर अक्रोडाचा आहारात समावेश केल्यास फुफ्फुसाच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. श्वासोच्छवासाच्या समस्या म्हणजे दम्यामध्ये देखील हे फायदेशीर आहे.
 
फॅटी फिश- ज्या माशांमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते अशा माशांचे सेवन फुफ्फुसांसाठी फायदेशीर ठरते. त्यामध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे प्रमाण पुरेसे असते.
 
 बेरी- कोणत्याही प्रकारच्या बेरीचे सेवन केल्याने फुफ्फुसे निरोगी राहतात. बेरीमध्ये व्हिटॅमिन सी सारख्या अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात.
 
ब्रोकोली- अँटी-ऑक्सिडंट्सने युक्त ब्रोकोली फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी आहे. फुफ्फुसाव्यतिरिक्त ब्रोकोली शरीराच्या स्टॅमिना साठी देखील चांगली मानली जाते.
 
आले- आल्यामध्ये केवळ दाहक-विरोधी गुणधर्म नसून ते फुफ्फुसातील प्रदूषण दूर करण्यासही मदत करते. आल्याचे सेवन केल्याने फुफ्फुसातील वायुमार्ग उघडतात आणि ऑक्सिजनचे परिसंचरण चांगले होते. तसेच, ते फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
 
 सफरचंद- रोज सफरचंद खाणे निरोगी फुफ्फुसांसाठी फायदेशीर आहे. यातील जीवनसत्त्वे फुफ्फुसांना निरोगी ठेवतात. एका संशोधनानुसार, व्हिटॅमिन-ई, सी, बीटा कॅरोटीन आणि आंबट फळे फुफ्फुसांसाठी खूप चांगली मानली जातात.
 
फ्लेक्ससीड्स- एका संशोधनात असे आढळून आले आहे की, जवसाच्या बिया खाल्ल्याने फुफ्फुसांचे नुकसान होण्यापासून तर बचाव होऊ शकतोच, पण इजा झाल्यानंतरही या बियांनी फुफ्फुसे बरे होऊ शकतात.
Edited by : Smita Joshi