शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (13:26 IST)

स्किनवरील हे लक्षणं कोरोनाचे संकेत तर नाही

मागील एक वर्षापासून कोरोनाने थैमान मांडला आहे. विविध लक्षणं समोर येत आहे त्यापैकी ताप, सर्दी-खोकला, वास न येणे, हे कोरोना संसर्गावेळी जाणवतात. पण त्वचेशी निगडित समस्यास देखील असल्याचे समोर आल्यावर काळजी वाढू लागली आहे.
 
त्वचेवर सूज येणे किंवा अॅलर्जी हे देखील संक्रमणाचे संकेत असू शकतात. त्वचेवर लाल चट्टे ही लक्षणं देखील बघण्यात येत आहे. अशी लक्षणं असल्यास बरं होण्यासाठी कालावधी देखील जास्त लागत असल्याचे कळून येत आहे. त्याहून ही लक्षणं लहान मुलांमध्ये संक्रमण झाल्यानंतर दिसून येतात.
 
संक्रमण नसा आणि रक्तवाहिन्यांमध्ये पसरण्याचा धोका असल्यामुळे त्वचेवर जळजळ, पुरळ उठणे, लाल रंगाचे चट्टे येणे, तीव्र खाज येणे, त्वचा कोरडी पडणे असे लक्षणं असू शकतात. शरीरावर कोरडेपणा किंवा डाग दुर्लक्ष करता कामा नये.
 
तसेच संसर्गाने ग्रस्त असणार्‍यांच्या घश्यावर तर परिणाम जाणवत आहे तरी ओठांवर देखील कोरडेपणा ही लक्षणे दिसून येत आहे. डिहायड्रेशनमुळे पुरेसं पोषण मिळत नसल्याने घसा खवखवणे आणि ओठ कोरडे पडण्यासारखी समस्या उद्वभते. ओठ निळे पडणे हे कोरोना संसर्गाचे सगळ्यात मोठं लक्षण असू शकतं. अशा कोणत्याही बदलकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरु शकतं.