मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 1 जुलै 2020 (12:30 IST)

जेवण केल्यानंतर हे काम चुकून करू नये, आरोग्यावर परिणाम होतो

जेवण केल्यावर आपल्याला काही खबरदाऱ्या घ्यायला पाहिजे. जेवण केल्या-केल्या अनेकांना आळस भरतो आणि झोप येऊ लागते. असे आपल्या काही चुकीच्या सवयीमुळे होतं. या सवयीचे कारण आहे की आपण अजाणतेमुळे जेवल्यानंतर काही अश्या वस्तूंचे सेवन करतो ज्यामुळे आपल्या आरोग्यास वाईट परिणाम पडतो. तर मग जाणून घेऊया की त्या अश्या कोणत्या गोष्टी आहे ज्यांचे सेवन लगेच जेवल्यावर करू नये. 
 
आपण जेवल्यानंतर लगेचच थंड पाणी पितो. पण हे आपल्या आरोग्यास हानिकारक आहे. थंड पाणी पिण्यामुळे आपल्या जेवणाचे गुच्छ बनतात ज्यामुळे आपल्या पचनास अडथळा येतो म्हणू जेवण्याचा किमान 45 मिनिटानंतर पाणी पिणे सोईस्कर असतं. जेवल्यानंतर कोमट पाणी किंवा खोलीच्या तापमानाचं पाणी प्यावं.
 
काही लोकांची सवय असते की जेवण झाल्यावर चहा किंवा कॉफी घेण्याची. पण त्यामध्ये असलेले टेनिन नावाचे घटक आपल्या पचनाची क्रिया मंदावते ज्यामुळे भूक न लागणे, चक्कर येणे, हात- पाय गार पडणे या सारख्या समस्या होतात. ज्यामुळे अशक्तपणा उद्भवू शकतो. जेवण झाल्याच्या 1 किंवा 2 तासानंतर चहा किंवा कॉफी घ्यावी.
 
हे तर सर्वांनाच ठाऊक आहे की सिगारेट ओढणे आरोग्यास हानिकारक आहे, पण जेवण्याच्या नंतर सिगारेट ओढणे तर अजून जास्त हानिकारक आहे. जेवल्यानंतर एक सिगारेट ओढणे म्हणजे 10 सिगारेट ओढण्या सारखे आहे यामुळे अल्सर होण्याचा धोका कित्येक पटीने वाढतो.
 
फळ खाणं हे आरोग्यास फार चांगले असतं पण जर का हे रिकाम्या पोटी खाणे तर ते जास्त फायदेशीर असतं. जेवल्यानंतर फळ खाल्ल्याने ते पचनास जड जातं, आणि आपल्या शरीरास त्या फळाचे पूर्णपणे लाभ मिळतं नाही. आपण फळांना स्नॅक्स म्हणून आपल्या जेवणात सामील करू शकतो. 
 
काही लोकांची सवय असते जेवल्यानंतर लगेच अंघोळीला जाण्याची. पण हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असतं. कारण अन्न पचण्याच्या प्रक्रियेसाठी एका विशिष्ट तापमानाची गरज असते पण अंघोळ केल्याने आपलं शरीर थंड होत. ज्यामुळे जेवण पचत नाही. म्हणून जेवण झाल्यावर लगेच अंघोळ करू नये. 
 
दिवस भर घरी आणि ऑफिसात काम करून आपण दमतो आणि रात्री जेवल्या जेवल्या लगेच झोपतो. पण आपल्याला अन्न पचवणं देखील महत्त्वाचं असतं. म्हणूनच जेवण झाल्यावर काही वेळ फिरणं आवश्यक असतं. जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे छातीत जळजळ, झोपेत घोरणं सारख्या समस्या होऊ शकतात.