दाद ... खाज... खुजली....

itching tips
Last Updated: शनिवार, 29 फेब्रुवारी 2020 (15:22 IST)
शीर्षकावरून लक्षात आलेच असेल की, या लेखाद्वारे आपण सर्वसाधारणपणे लोक ज्याला जला नायटा, दाद अथवा गजकर्ण संबोधतात अशा बुरशीजन्य संसर्गाबाबत माहिती घेणार आहोत. याचे सर्वसाधारण प्रकार - रिंगवर्म, अ‍ॅथलेटस्‌ फूट व जॉक इच आहेत.
* रिंगवर्म - यामध्ये गोलाकार लालसर चट्टे उमटतात. हे कुठल्याही कृमीमुळे होत नाही.
* अ‍ॅथलेटस्‌ फूट - पायाच्या बोटांमध्ये खाज, आग अथवा चिरा आढळतात.
* जॉक इच - यामध्ये मांड्याच्या आतील बाजूस लालसर खाजवणारे चट्टे उमटतात.

सर्वसाधारणपणे उन्हाळा व पावसाळा या दोन ऋतूंमध्ये हाआजार उद्‌भवतो. मागील वर्षभरात या आजारात बरीच वाढ झालेली आढळून येते. हा एक संसर्गजन्य आजार आहे व त्वचेच्या स्वच्छतेशी याचा संबंध येतो. हा आजार जास्त धोकादायक नसला तरी त्रासदाक आहे. वेळीच उपचार न केल्यास सामाजिक व मानसिक आरोग्य धोक्यात येते. यासाठी पुढील काळजी घेणे गरजेचे आहे.
काय करावे?
* नियमितपणे हात स्वच्छ धुवावेत.
* आंघोळीनंतर स्वच्छ टॉवेलने शरीर पूर्ण कोरडे करावे.
* जननांगाजवळील त्वचा स्वच्छ व कोरडी ठेवावी.
* अंतवस्त्रे उलटी करून त्यांना इस्त्री करून ती वापरावीत.
* खेळून आल्यावर अथवा श्रमाची कामे केल्यानंतर आपले कपडे व अंतवस्त्रे धुवून टाकावीत.
* तसेच घाम जास्त येत असल्यास दिवसातून दोनवेळा आंघोळ करावी.
* कपडे उन्हात वाळवून वापरावेत. सैलसर व कॉटनचे कपडे वापरावेत.
* नखे योग्य आकारात लहान ठेवावीत.
* नखांच्या क्युटिकलना (बाजूची त्वचा) मॉईश्चरायजर लावावे.
* सॉक्स शक्यतो कॉटनचे, हवा खेळती राहील असे वापरावेत. नियमित बदलावेत.
* पाय कोरडे ठेवावेत.
* दादची लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरी सल्ल्याने उपचार करावेत.
काय करू नये ?
* एकमेकांचे टॉवेल,बेडशीट, कपडे, कंगवे, शूजचा वापर करू नये.
* वैयक्तिक स्वच्छतेचे सामान इतरांबरोबर वापरू नये. घट्ट फिटिंगची अंतर्वर्स्त्रे तसेच पॅन्ट अथवा लेगीन्स घालू नये.
* केशरहित, चट्टेु्युक्त प्राण्यांना हात लावू नये. लोकरीचे कपडे, नालॉनचे कपडे बर्‍याच काळासाठी घालणे टाळावे.
* ज्या सॉक्समुळे पायाला घाम येईल, असे सॉक्स अथवा पादत्राणे घालू नयेत.
* ओले कपडे कपाटात ठेवू नये व घालूही नये.
* क्यूटिकलना कापू नये.
* नखांचा वापर हत्यारासारखा (उदा. टिन उघडणे वगैरे) करू नये.
* स्पोर्टस्‌ चेंजिंग रूम अथवा सार्वाजनिक जलतरण तलावाजवळ उघड्या पायांनी फिरू नये. संसर्ग झाल्यास नखांनी खाजवू नये.
* सार्वजनिक स्नानघर व शौचालयाचा वापर टाळावा.
* संसर्ग झाल्यास जिम, जलतरण तलाव आदी ठिकाणी जाऊ नये.
* स्वऔषधी उपचार घेणे टाळावे.
अशा पद्धतीने काळजी घेतल्यास रशीजन्य संसर्गापासून तुमचा बचाव होईल. परंतु जर हा संसर्ग झाल्यास तर योग्य तज्ज्ञांकडून यावर उपचार करावेत. बरचवेळ्या खाज अथवा लालसरपणा कमी झाला की, रुग्ण मनानेच औषधे बंद करतात. अथवा पुनर्परिक्षणासाठी डॉक्टरांकडे जात नाहीत. त्यामुळे
हा आजार अधिक बळावण्याची शक्यता असते.

उपचारांमध्ये विविध क्रीम्स, साबण, पावडर, पोटातून घेण्याची औषधे यांचा समावेश असतो. डॉक्टरी

सल्ल्याने योग्य उपचाराने या संसर्गापासून तुमची सुटका होऊ शकते. अशा पद्धतीने त्वचेची काळजी घेतल्यास बुरशीजन्य संसर्गापासून आपला बचाव होऊ शकतो. या संसर्गाला तुमच्या जीवनावर हावी होऊ देऊ नका.
डॉ. तृप्ती राठी


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

झटपट किचन टिप्स

झटपट किचन टिप्स
गृहिणींना रोजचा स्वंपाक करताना काही छोट्या – मोठ्या अडचणी येतात. अशावेळी नेमके काय करावे ...

रोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ ...

रोग प्रतिकारक शक्ती वाढवू या... हळदीचे गुणधर्म जाणून घेऊ या...
आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते की आरोग्य चांगले असेल तर काहीही करता येतं म्हणजे ...

ब्रोकोली गुणांचा खजिना....

ब्रोकोली गुणांचा खजिना....
ब्रोकोली ही लोकप्रिय भाजी नाही. बऱ्याच लोकांना ह्या बद्दल जास्त माहिती नाही. पण ब्रोकोली ...

सोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स

सोप्या पध्दतीने घरीच पटकन तयार करा कुरकुरीत केळीचे वेफर्स
सर्वात आधी कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्या. एका बाऊलमध्ये बर्फाचं पाणी घेऊन त्यात मीठ ...

आयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी

आयुर्वेद आणि स्वयंपाकाची भांडी
आयुर्वेद आणि स्वयंपाकासाठी वापरली जाणारी भांडी यांचाही जवळचा संबंध आहे. कारण ...