बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (16:11 IST)

विजेचा झटका लागल्यास काय कराल?

विजेचा जोराचा झटका लागल्यास बरेचदा व्यक्ती विजेच्या स्त्रोतालाच चिटकून राहते. सर्वप्रथम त्यांना विजेच्या स्त्रोतापासून दूर करा. यासाठी वीज पुरवठा खंडीत करून प्लग काढा. कारण बरेचदा बटण बंद करून वीज पुरवटा सुरूत राहतो.
 
हे शक्य नसल्यास, त्या व्यक्तीला थेट स्पर्श न करता एखाद्या कोरड्या वीज प्रतिरोधक वस्तूच्या सहाय्याने स्त्रोतापासून दूर करा. यासाठी त्या व्यक्तीकडे एखादे ब्लँकेट फेकता येईल किंवा लाकडाची काठी, लाकडी खुर्ची, स्टुलाचाही वापर करता येईल.
 
वैद्यकीय मदत बोलवा
त्या व्यक्तीला तपासून गरज असल्यास लगेच रुग्ण वाहिकेला बोलावून घ्या. अन्यथा त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा.
 
* ती व्यक्ती बेशुद्ध असल्यास रुग्णवाहिका येईपर्यंत तुम्ही त्यांना मदत करू शकता.
* ती व्यक्ती श्वासोच्छ्वास करत नसेल वा धिम्या गतीने करत असेल, तर त्यांना सीपीआर अर्थात तुम्हाला याचे योग्य तंत्र अवगत असल्यासच देता येईल.
* त्यांना झोपावून डोके शरीराच्या मानाने थोडे खालच्या दिशेने आणि पाय उंचावर ठेवा.>
* रुग्णाभोवती ब्लँकेट गुंडाळा.
* रुग्णांची कमीत कमी हालचाल करा. विजेच्या झटक्यामुळे त्यांना आंतरित इजा झाली असण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत हालचालीमुळे गुंतागुंत वाढू शकते.
* रुग्णाची त्वचा भाजली असल्यास जखमेवरील कपडे हळूवार काढा. (मात्र त्वचा कपड्यांनी चिकटली असल्यास असे मुळीच करू नका.)
* भाजलेल्या जखमेवर थंड वाहते पाणी घाला. मात्र त्यावर बर्फ किंवा इतर कोणतेही मलम लावू नका. वैद्यकीय मदतीची वाट पहा.
 
सावधगिरी
* विजेचा झटका लागलेली व्यक्ती विजेच्या संपर्कात असल्यास हाताने स्पर्श करू नका.
* विजेचा प्रवाह बंद केल्याशिवाय अधिक व्हॉल्टेजच्या वायरच्या जवळपासही जाऊ नका.
* वायरमधून ठिगण्या येत असल्यास किंवा ती हालत असल्यास त्यापासून किमान 20 फूट रहा.