बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 18 मार्च 2021 (09:00 IST)

काय सांगता, बोर खाल्ल्याने आरोग्याच्या तक्रारी जातात

बोर एक आंबट गोड फळ आहे. खाण्यात जेवढे चविष्ट आहे तेवढेच आरोग्यासाठी फायदेशीर देखील आहे. आपण हिवाळ्यात बोर खाता तर आपल्याला आरोग्याचे फायदे मिळतात. चला तर मग ह्याचे फायदे जाणून घेऊ या. 
 
1 त्वचेवर जखम असल्यास किंवा कापले असेल तर बोराचे गीर काढून त्यावर लावावे. असं केल्याने जखम त्वरित बरी होते. 
 
2 बोराचे सेवन केल्याने कोरडेपणा आणि थकवा दूर होतो. 
 
3 बोराच्या पानांमध्ये कॅल्शियम, फास्फोरस, मॅग्नेशियम, पोटेशियम, सोडियम, क्लोरीन, मुबलक प्रमाणात आढळते. आपण बोर आणि कडुलिंबाची पाने वाटून केसांना लावल्याने केसांची गळती कमी होते. 
 
4 बोराचे ज्यूस प्यायल्याने ताप आणि फुफ्फुसाचे विकार बरे होतात. 
 
5 बोरावर काळे मीठ लावून खाल्ल्याने अपचनाचा त्रास दूर होतो.
 
6 कोरडे बोर खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि पोटाचे विकार दूर होतात. 
 
7 आपण बोर आणि ताक घेता तर या मुळे मळमळणे, पोट दुखी सारखे त्रास कमी होतात. 
 
8 नियमितपणे बोर खाल्ल्याने दम्याचा रुग्णांना देखील आराम मिळतो  तसेच हिरड्यांमध्ये जखम झाली असेल तर ती देखील लवकर भरते.