थंडीत आपल्या आहारात या पदार्थांचा समावेश करा
थंडीत आहारात काही पदार्थांचा समावेश केला तर ते आपल्या शरीराला गरम ठेवतात. तसेच थंडीत गरम कपडे घालण्यासोबत आपल्या आहारात या पदार्थांचा समावेश करा -
१) हिरवी मिरची - हिरव्या मिरच्या खाल्ल्याने शरीरातली गरमी वाढते. मिरचीचा तिखटपणा शरीराचे तापमान वाढवतो.
२) कांदा - कांदा खाल्ल्यावर शरीराचे तापमान वाढते आणि घामसुद्धा येतो. कांदा खाल्ल्याने थंडीपासून होणारे आजार आपल्या शरीरापासून लांब ठेवण्यास मदत होते.
३) अद्रकचा चहा - आपल्या शरीराला गरम ठेवण्याचा सर्वांत सोपा उपाय म्हणजे अद्रकचा चहा.
४) हळद - थंडीसाठी सर्वांत उत्तम औषध म्हणजे हळद. थंडीला पळविण्यासाठी हळद गरम दुधात मिसळून प्या.
५) ड्राय फ्रूटस् - खजूर, मणुके आणि इतर ड्राय फ्रूटस् रोज खाल्ल्याने शरीर स्वस्थ राहते.