शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : बुधवार, 8 जुलै 2020 (21:52 IST)

कवठ: चविष्ट आणि आरोग्यवर्धक

माणसाचं आणि झाडांचं नातं हे कित्येक वर्षांपासूनचं आहे. जेवढी प्रगाढ मैत्री तेवढीच निरोगी प्रकृती. जेवढी आनंदी प्रकृती तेवढाच निरोगी माणूस. त्यात भर पाडतात असे फळ जे खाण्यासाठी तर चविष्ट आहेच, आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. आज आम्ही येथे आरोग्यदायी फळाबद्दल बोलत आहोत ज्यांचे नाव आहे कवठ. याला कपित्थ, कवंठ, कवंठी, कवठ आणि इतर नावाने ओळखलं जातं. नाव घेतल्यासोबतच तोंडाला पाणी सुटतं कारण चवीला आंबट-गोड असणार्‍या फळाचा स्वादाचं नव्हे तर गुण देखील जाणून घेण्यासारखे आहेत.
 
कवठ : 
कवठाचे वैज्ञानिक नाव फिरोनिया लिमोनिया आहे. कवठामध्ये व्हिटॅमिन बी 12 आढळतं. या पासून वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवतात जसे जॅम, जेली, सरबत, चॉकलेट आणि चटणी इत्यादी. रक्तदाबाच्या बरोबरच कॉलेस्ट्राल साठी हे फळ फायदेशीर आहेत.
 
फायदे : 
* पिकलेल्या फळाचे सरबत शरीराच्या तापमानाला नियंत्रित करण्यात साह्याय्य करत.
* ह्याचा भुकटी औषधी रूपात घेतात.
* ह्याचे फळ रक्तदाब आणि कॉलेस्ट्राल नियंत्रित करतं.
* कच्च्या फळात पिकलेल्या फळांपेक्षा व्हिटॅमिन सी आणि फ्रूट ऍसिड जास्त प्रमाणात आढळतं.
* बियाणांमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असतं. या मध्ये सर्व महत्त्वाचे लवणं आढळतात तर ह्याच्या गरात कार्बोहायड्रेट आणि फायबर असतं. या मध्ये व्हिटॅमिन बी 1 आणि बी 2 देखील असतं.