शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: गुरूवार, 17 जानेवारी 2019 (00:07 IST)

उच्च रक्तदाबावर घरच्या घरी करा उपचार

उच्च रक्तदाबात चक्कर येतात, डोकं घर घर फिरायला लागतं, कुठल्याही कामात मन लागत नाही. त्याच्यात शारीरिक श्रम करण्याची क्षमता नसल्या सारखी होते. रोग्याला झोप येत नाही. 
 
या आजाराचा घरगुती इलाजसुद्धा शक्य आहे, पण त्यासाठी संयम बाळगणे जरूरी आहे. 
 
* तीन ग्रॅम मेथीदाणा पूड सकाळ-सायंकाळ पाण्यासोबत घ्यावी. 15 दिवस बीन नागा करून ही पूड घ्यावी याने नक्कीच आराम पडतो. ही पूड मधुमेहीच्या रोग्यांसाठीपण फायदेशीर आहे. 
 
* कणीक व बेसन सम मात्रेत घेऊन त्याच्या पोळ्या तयार करून त्या खूप चावून चावून खाल्लयाने 10 दिवसातच उच्च रक्तदाबात आराम मिळतो.
 
* टरबुजाच्या बियांची गिरी आणि खसखस सम मात्रेत घेऊन वेग वेगळे वाटून एका बरणीत भरून ठेवावे. उपाशी पोटी रोज एक चमचा हे घ्यावे.
 
* जेवणानंतर नेमाने रोज ताक घ्यावे.
 
* उच्च रक्तदाबाच्या रोग्यांसाठी पपीता फायदेशीर ठरतो, म्हणून रोज त्याचे सेवन केले पाहिजे. 
 
* 5 तुळशीचे पानं आणि 2 कडू लिंबाच्या पानांना वाटून 20 ग्रॅम पाण्यात घालून उपाशी पोटी हे पाणी प्यावे. 
 
* गार पाण्याने अंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करावी, त्याच सोबत मीठ व जास्त प्रमाणात साखरेचा वापर करणे टाळावे.