मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Updated : बुधवार, 24 मे 2023 (19:54 IST)

Roasted Clove Benefitsभाजकी लवंग खाण्याचे फायदे

आपण भाजकी लवंग खाल्ल्याने आरोग्यास अनेक फायदे मिळतात. भाजकी लवंग खाण्याचे फायदे जाणून घेऊया. 
 
* भाजलेल्या किंवा भाजक्या लवंगाच सेवन केल्यानं तोंडातील वास उद्भवणाऱ्या जंतांचा नायनाट होतो आणि तोंडाचा वास कायमचा दूर होतो.
 
* दात दुखत असल्यास लवंग भाजून दातांच्या खाली दाबून ठेवावं आणि हळुवार चावावं. असे केल्यास दात दुखी पासून सुटका मिळेल.
 
* एखाद्या प्रवासामध्ये किंवा घरात आपल्याला मळमळत असल्यास किंवा उलटी सारखं होत असल्यास भाजकी लवंग चावावी. असे केल्यास आराम मिळेल.
 
* या मध्ये अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात. आपल्याला डोकेदुखीचा त्रास तीव्रतेने होत असल्यास, दोन लवंगा भाजून खाव्यात. या मुळे डोकेदुखी पासून सुटका होते.
 
* जेवल्यावर भाजकी लवंग चावल्याने ऍसिडिटी आणि छातीत होणारी जळजळ दूर होते. दोन लवंगा भाजून खाल्ल्यानं कोरडा खोकला, कफ सारख्या त्रासापासून सुटका मिळतो. या शिवाय घशातील सूज देखील दूर होते.