1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Updated : शुक्रवार, 15 मे 2015 (10:40 IST)

घरचा वैद्य

आंब्यामध्ये अ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे रातांधळेपणावर तो औषधाप्रमाणे गुणकारी ठरतो. तसेच बुबुळांची शुष्कता, डोळ्यांची आग होणे, खाज येणे हे नेत्रदोष, उन्हाळ्यामध्ये नियमित आंबा सेवन केल्याने टाळता येतात.
 


 



नारंगी रंगाच्या गाजरात कॅरोटिन व फॉस्फरस असल्यामुळे त्याच्या सेवनाने डोळ्यांना खूप फायदा होतो. शिवाय गंधकयुक्त घटक असल्याने रक्त शुद्ध होते.

गाजर वाफवून त्याचे सूप प्यायल्याने जुलाब बंद होतात. शिवाय भूकही चांगली लागते. गाजराचे बी पाण्यात वाटून पाच दिवस प्यायल्याने स्त्रियांना ऋतिप्राप्ती होते.
 
सोरायसिस या त्वचेच्या आजारात मांसाहार, अंडी, साखर, विविध मसाले, चहा, कॉफी हे पदार्थ टाळावेत. तंबाखू, मद्यपान, धूम्रपान वर्ज्य करावे. ताकाचा समावेश आहारात असावा.
 
जेवल्यानंतर अनेकदा पुन्हा भूक लागते. पोट भरल्यासारखे वाटत नाही. अशावेळी केळ खावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि ताजेतवाने वाटते.