शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. घरचा वैद्य
Written By वेबदुनिया|

सर्दीत उपयोगी गवती चहा

ND
सर्दी-पडसे आणि अंग मोडून ताप आला की, आपल्या परसदारी असलेला गवती चहा स्वयंपाकघरात येतो. गवती चहा घालून बनवलेला चहा तक्रारी कमी करतो.

गवती चहा एक प्रकारचे गवतच आहे. या गवताची बेटे दभीच्या बेटासारखी मोठमोठी वाढतात. यात पातीचा चहा म्हणतात. गवती चहापासून काढलेल्या तेलाला ट्री-ट्री-ऑइल म्हणतात.

ताप आला असताना घाम येणे हे ताप उतरण्याच्या दृष्टीने आवश्यक असते. गवती चहाची भरपूर पाने घालून बनवलेला चहा ताप आलेल्या व्यक्तीस दिल्याने, खूप घाम येऊन ताप उतरतो.

अजीर्णामुळे पोट दुखत असेल, तर गवती चहाच्या तेलाचे दोन थेंब बत्ताशावर टाकून खायला द्यावे. उलट्या-जुलाब होत असतील, तर गवती चहामुळे थांबतात.

सांधेदुखी, सांध्यातून कट कट आवाज होणे, सांधे सुजणे या तक्रारींवर गवती चहाचे तेल चमचाभर घेऊन दोन चमचे

खोबरेल तेलात मिसळून गरम करावे. त्यात एक कापराची वडी टाकून त्या तेलाने दुखरे सांधे मालीश करावे आणि शेकावे.

गवती चहाच्या वाफेने दररोज शेक घेतल्याने भरपूर घाम जाऊन चरबी जळते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

गवती चहा, पुदिना, दालचिनी, आलं समप्रमाणात घेऊन त्यात पाणी आणि गूळ मिसळून काढा करावा. हा काढा अर्धा कप प्रमाणात रोज रात्री प्यावा आणि उबदार कपडे, पांघरूण घेऊन झोपावे. यामुळे जुनाट सर्दी-पडसे कमी होते.