Widgets Magazine
Widgets Magazine

दोष कोणाचा?

drink
एक स्त्री आणि एक पुरूष दोघांच्या गाडीचा अपघात होतो. चूक स्त्रीची असते. ती अचानक मध्ये आलेली असते. सुदैव हे की दोघांच्या गाड्यांचे बरेच नुकसान झालेले असले तरी दोघांना किरकोळ खरचटणे सोडून मार लागलेला नसतो. दोघं कसे तरी बाहेर येतात.
पुरूष काही बोलणार इतक्यात ती स्त्री पर्समधून नवी कोरी क्वार्टर काढते. "मला माहीत आहे, आपण दोघंही या घटनेने हादरलो आहोत. जरा शांत होऊ या आणि मग बोलू. घ्या जरा दोन पेग मारा, मी पण घेईन आणि मग ठरवू काय ते"

पुरूष क्वार्टर हातात घेऊन अर्धी पिऊन स्त्रीला परत करतो. ती स्त्री शांतपणे बाटली परत पर्स मध्ये ठेवते. "तुम्ही नाही घेणार?" तो विचारतो.
"नाही" स्त्री उत्तरली
Widgets Magazine
.
.
.
.
.
."आता आपण पोलिसांची वाट पाहू या. तेच ठरवतील दोष कोणाचा आहे ते."

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :