1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पुण्याचे नागरिकत्व

whatsapp marathi joke
माझी गाडी एकदा भर पावसात म्हात्रे पुलाजवळ बंद पडली...
 
मी खाली उतरून काय झालंय ते बघत होतो... कारण सापडत नव्हतं. मागचा गाडीवाला सतत हॉर्न वाजवीत होता. किंबहुना तो हॉर्नवरचा हात काढतच नव्हता.
 
मी शांतपणे त्याच्याजवळ गेलो व भिजत भिजतच म्हणालो, "तुम्ही बघता का माझ्या गाडीला काय झालंय ते? तेवढा वेळ मी तुमच्या गाडीचा हॉर्न वाजवीत बसतो."
 
त्या दिवशी मला पुण्याचे नागरिकत्व मिळाले