testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पोट धरून हसा...

aeroplane
पुणेरी टोमणे एरलाईन्स (पु.टो. एरलाईन्स) चे एक स्वतंत्र विमानतळ

Welcome to PuTo airlines

लोकं विमानात चढली, अन् अनाउंसमेंट झाली

"सर्वांनी आपापल्या जागेवर पटापट बसून घ्यावे, आपल्या घरातील पॅसेज मध्ये फिरल्या सारखे विमानात इकडून तिकडे फिरत बसू नये"

हवाई सुंदरी आता सेफ्टी डेमो देत आहेत,

"डेमो एकदाच दाखवला जाईल,, सर्वांनी आमच्या चेहर्‍याकडे न पाहता हाताकडे लक्ष देवून नीट डेमो पहावा, नंतर तक्रार चालणार नाही"


"हा सिटबेल्ट असा घट्ट बांधावा, सिटबेल्ट फार ताणू नये, तुटल्यास पैसे भरून द्यावे लागतील"


"पोट फारच सुटले असल्यास, सीटबेल्ट ओढून ताणून बांधण्याचा आग्रह करू नये, तुम्हाला वेगळी सुतळी दिली जाईल"

"ऑक्सिजन चा दबाव कमी झाल्यास वरून ऑक्सिजन मास्क पडतील, ते पटापट तोंडावर लावावे, याचा मास्क काळा माझा पिवळा का वगैरे वाद घालू नये, सर्वाना सेमच ऑक्सिजन पुरवठा होईल"

"संकटकाळी स्थितीत विमानाचे पुढचे 2 आणि मागचे 2 दरवाजे उघडतील, एकेकानी सय्यम ठेवून उतरावे, फार धक्काबुक्की, गडबड केल्यास दरवाजे आपोआप बंद होतात, अडकून बसावे लागेल"


"तुमच्या डोक्यावर एअर होस्टेस ला बोलवायचे गुलाबी बटन आहे, त्याला अजिबात हात लावू नये"


"नाष्टया मध्ये जे असेल तेच मिळेल, आम्हाला वडापाव, भेळ, मिसळच पाहिजे वगैरे हट्ट चालणार नाही, हि सारसबाग नाही"

"एक्स्ट्रा कांदा व सॅम्पल मिळणार नाही, पैसे देतो हो वगैरे ऐकून घेतलं जाणार नाही"


"दुपारी 1 - 4 या वेळेत विमान असेल त्या जागी बंद करण्यात येईल, काळजी नसावी"


"विमान तुमच्या डेस्टिनेशन ला पोचल्यावर पटापट उतरावे, निवांत बाहेर पडायला हे चित्रपटगृह नाही"


"डोळ्यावर काळा चष्मा आणि खांद्यावरील सर्व भाग स्कार्फ ने झाकलेला आढळल्यास अतिरेकी समजून उडत्या विमानातून ढकलून देण्यात येईल."

" तुमचा प्रवास सुखकर होवो !"
.
.
.
.
.
.
.
.
.
.

" आता हि पोस्ट कॉपी करून पुण्याच्या जागी दुसऱ्या शहराचे नाव टाकुन तुमच्या पेज वर रिपोस्ट करू नये, काही गोष्टी पुण्यालाच सूट होतात "


यावर अधिक वाचा :

मराठी बिग बॉसचे घर प्रेक्षकांच्या भेटीला

national news
बिग बॉसचे मराठमोळं घर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. आपणही बिग बॉसच्या घरात जावे अशी ...

काय मत आहे तुमचं...???

national news
बिग बाजार / D mart मध्ये बायकोच्या मागे निरर्थक हिंडतांना अनेक केविलवाणे नवरे मी ...

करिश्माला करायचाय माधुरीचा बायोपीक

national news
अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या खूप खूश आहे. तिच्या खुशीचे कारणही तितकेच खास आहे. एकीकडे ती ...

चांदोमामाला अगदी जवळून पाहता येणारी मून व्हॅली

national news
आपला बालपणीचा सवंगडी चांदोमामा म्हणजे चंद्रावर जाण्याची संधी आपल्याला कधी मिळेल कोणास ...

पराक्रमाच्या गाथा सांगणारा 'फर्जंद' ठरतोय महत्त्वाचा

national news
प्रेम कहाण्यांपेक्षा पराक्रमांच्या गाथा मांडणारे चित्रपट नेहमीच तरुणांचे आकर्षणबिंदू ...