testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बायकोला नावं ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे !

Last Modified बुधवार, 6 डिसेंबर 2017 (12:12 IST)
बायको जर नसेल तर
राजवाडा पण सुना आहे
बायकोला नावं ठेवणे हा
खरंच गंभीर गुन्हा आहे

खरं पाहिलं तर तीच्या शिवाय
पानही हालत नाही
घरातलं कोणतंच सुख
बायको शिवाय फुलत नाही

नौकरी अन पगारी शिवाय
नवऱ्या जवळ आहे काय ?
तुलनाच जर केली तर
सांगा तुम्हाला येतं काय ?
स्वच्छ , सुंदर , पवित्र घर
बायकोमुळे असतं
नवरा नावाचं विचित्र माणूस
तिलाच हासत बसतं

वय कमी असून सुद्धा
मुलगी समजदार असते
बायको पेक्षा नवऱ्याचे वय
म्हणून जास्त असते !

तिचा दोष काय तर म्हणे
चांगल्या सवयी लावते
कुटुंबाच्या कल्याणासाठी
दिवस रात्र धावते
चिडत असेल अधून मधून
सहनशीलता संपल्यावर
तुम्हीच सांगा काय होणार
चोवीस तास जुंपल्यावर

बायकोची टिंगल करून
फिदी फिदी हासू नका
तिच्या यादीत मूर्ख स्थानी
नंबर एक वर बसू नका

बायको म्हणजे अंगणातला
प्राजक्ताचा सडा
बायको म्हणजे पवित्र असा
अमृताचा घडा
बायको म्हणजे सप्तरंगी
इंद्रधनुष्य घरातलं
देवासाठी गायलेलं
भजन गोड स्वरातलं

नवरोजी बायकोकडे
माणूस म्हणून पहा
तिचं मन जपण्यासाठी
थोडं शांत रहा

कधीतरी कौतुकाचे
दोन शब्द बोलावत
तिच्या वाट्याची दोन कामं
आनंदाने झेलावेत
बायकोचं कौतुक करणं म्हणजे
नवरे वाईट नसतात
कधी कधी विनाकारण
टिंगल करत बसतात

प्रा. विजय पोहनेरकर


यावर अधिक वाचा :