testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

साठीचीच स्त्री आता सर्वात तरुण असते

Last Modified मंगळवार, 5 डिसेंबर 2017 (11:07 IST)
साठीचीच स्त्री आता सर्वात तरुण असते
अनुभवांच्या शिदोरीसकट बोल्डसुद्धा असते

कुरकुरणाऱ्या गुडघ्यांना ती सहज Replace करते
डोळ्यातली लेन्स अन् तोंडातली कवळी सहज adjust करते
नातवंडांबरोबर लहान होते सुनेचीही मैत्रीण होते
संसारात राहूनही स्वतः ची स्पेस जपते.

गाणी गोष्टी मूव्ही नाटक हव्वे तेव्हा बघते
साठी बुद्धी नाठी म्हण सपशेल खोटी ठरते

बाहेर जाण्यासाठी आता परवानगी लागत नाही
लोक काय म्हणतील याची काळजी करत नाही

साडी आणि सासू आता discussion बाहेर असते
विमानाचे पंख लावून तिला जग फिरायचे असते
अंगभर दागिन्यांना केव्हाच सुट्टी देते
डायमंडचं मंगळसूत्र तेवढं दिमाखात मिरवते

जगायचच राहून गेलेलं ती आता जगत असते
साठीचीच स्त्री आता सर्वात तरुण असते.

डॉ संगीता गोडबोले


यावर अधिक वाचा :

'मुळशी पॅटर्न'नंतर आता 'रेती पॅटर्न'

national news
सध्या राज्यभरात 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडे ...

दीपिकाची भविष्यवाणी

national news
अभिनेत्री दीपिका पदुकोण-रणवीर सिंग लग्न झाल्यापासून वेगवेगळ्या कारणामुंळे चर्चेत आहेत. ...

‘देसी गर्ल’च्या लग्नाचे अपडेट सर्वात जास्त वेळा सर्च झाले

national news
गुगलनेही २०१८तील सर्वाधिक सर्च झालेल्या सेलिब्रिटींच्या लग्नाची एक यादी जाहीर केली. या ...

...म्हणून स्वरा भास्कर घेतेय मराठीचे धडे

national news
स्वरा भास्कर हिने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ...

अमृताचा 'कानाला खडा'

national news
आयुष्यात चढ उतार हे येतंच असतात. त्याला प्रत्येकाला सामोरे जावे लागते. मात्र, उतारा ...