testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आयुष्यबद्दल काय छान भाष्य आहे पहा...

बदलते ते वय
बदलत नाही ती सवय

भावतो तो भाव
भोवतो तो स्वभाव
सतत बदलतो तो रंग
अविचल असतो तो श्रीरंग

समज वाढवते ती संगती
अतिसंगाने जाणवते ती विसंगती

आतून उमटतो तो सूर
भावनाहिन सूर तो भेसूर

वहात जाते ती लय
वहावत नेतो तो प्रलय
आनंदाचा शोध ते जगणं
आनंदहि दुरावतं ते वागणं

स्वेच्छेने करतो ते अर्पण
उपेक्षा करतो तो दर्पण

ती/तो येता उठती ते तरंग
ती/तो नसता कण्हते ते अंतरंग

ति/त्या च्यासह असते ते घर
ति/च्या विणा उरते ती घरघर
तन दुखावतं ते शस्त्र
मन दुखावतं ते शास्त्र

त्यांच्याकडे असते ती कला
आमच्याकडे असतात त्या नकला

ते करतात तो व्यापार
आम्हास न जमे तो व्यवहार

अकस्मात् जडते ते प्रेम पुरून उरते ते दृढ सप्रेम!


यावर अधिक वाचा :