मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: बुधवार, 20 जून 2018 (12:26 IST)

जीवन खूप सुंदर आहे

केसांचा थोडा भांग विस्कटू दे, चश्म्यावर थोडी धूळ असू दे 
पळताना बुटाची नाडी सुटू दे, डावीकडून इन शर्ट बाहेर येऊ दे, काही बिघडत नाही !
भाजीत जास्त मीठ पडू दे, बघून आणलेला नारळ कुजू दे,
उठायला थोडा उशीर होऊ दे, नाटकाला थोडी डुलकी लागू दे, काही बिघडत नाही !
बोलताना मित्राचं नाव विसरू दे, बायकोनं सांगितलेलं काम राहू दे,
गाडीतलं कधी पेट्रोल संपू दे, मोबाईल फोन जरा बंद पडू दे, काही बिघडत नाही !
लिहिताना पेनाची शाई संपू दे, चित्रातला रंग थोडा बाहेर जाऊ दे 
वहीचं एखादं पान फाटू दे, गाताना एखादी तान चुकू दे, काही बिघडत नाही !
काय वाट्टेल ते होऊ दे पण आपल्याच चुकण्यावर, फसण्यावर हसायची ताकद असू दे, 
मग . . . . . . . . . . . . . . . . . खरंच काहीच बिघडतच नाही!!
जीवन खूप सुंदर आहे