testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

हल्ली मी ठरवलंय, स्वत:ला जपायचं

kavita
हल्ली मी ठरवलंय,
स्वत:ला जपायचं,
स्वत: मधल्या स्वत:लाचं,
प्रेमानं गोंजारायचं..
जिथं गुदमरतो श्वास,
तिथं नाही थांबायचं,
हसावं वाटलं तर,
खळखळून हसायचं..

नाकावरल्या रागालाही,
जरूर येऊ द्यायचं,
रडावं वाटलं,
तर स्वत:च स्वत:चा खांदा व्हायचं..

मी कशी दिसतेय,
कुणालाचं नाही विचारायचं,
आरशात स्वत:ला पाहातं,
स्वत:च मुरकायचं..
कधीतरी असंच,
खूप आळशी व्हायचं,
मलाही “ change “ हवाच की,
स्वत:लाचं बजावायचं..

मित्रमैत्रिंणींबरोबर मिळून,
खूप खूप बागडायचं,
वय असो कितीही,
नेहमी तरूणच राहायचं..

जाड वा बारीक, गोरी वा काळी,
नेहमी सुंदरच दिसायचं,
मनाच्या सौंदर्यालाही,
मनापासून जपायचं..
स्त्रीत्वाला आपल्या,
ना ग्रुहित धरू द्यायचं,
स्वावलंबी होऊन, ताठ मानेनं,
चालतचं राहायचं..

बकेट लिस्ट तरी का बनवावी
जे
मनात येईल ते करून मोकळे व्हावे
आपल्या इच्छा आपणच पूर्ण करायच्या

मी ठरवलंय ...


यावर अधिक वाचा :

परमार्थातही चातुर्य असावे

national news
“एकदा रावणाला सेवकाने सांगितले की, तुमचा भाऊ बिभिषण दारात रांगोळीवर "राम" हे नाव काढतो. ...

आमिरवर आली अशी स्थिती बसला गाढवावर

national news
अभिनेता आमीर वर गाढवावर बसण्याची वेळ आली असून त्यानेच ती शेअर केली आहे. झाले असे की ...

'बॉइज २' मधून गिरीश कुलकर्णी करणार 'तोडफोड'

national news
'बॉईज' सिनेमातले आयटम सॉंग म्हंटले कि, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लीओनीची ठसकेदार लावणी ...

रुदालीच्या निर्मात्या कल्पना लाज्मी यांचे निधन

national news
चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या आणि पटकथालेखिका कल्पना लाज्मी ( ६४) यांचे मुंबईतील ...

सॅन मरिनो

national news
रोमन साम्राज्यातून हद्दपार झालेल्या आणि पळून आलेल्या अनेक लोकांनी याच गावात आश्रय घेतला. ...