testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

खरच येतात का मित्रमैत्रिणी निवडता?

friends
काही लोक म्हणतात, चांगल्या मैत्रीणि निवडल्यास तू..
खरच येतात का मित्रमैत्रिणी निवडता?
निवडून केलेली मैत्री असते का? मला तर वाटतं... हिंदी सिनेमाचे हिरो कसे ओरडून सांगतात ना, प्यार किया नही जाता, हो जाता है, तसे.. मैत्री भी की नही जाती हो जाती है !
निवडून, ठरवून केली जाते ती मैत्री नसते, ते असतं कॉर्पोरेट स्टाइल रिलेशन बिल्डिंग ! कधीतरी उपयोगी पडेल म्हणून ओळख वाढवण्याने उपयोग होतसुद्धा असेल, पण आत्म्याला आनंद फक्त खऱ्या मैत्रीनेच मिळतो. कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त भेटायला आवडतं, एकत्र राहायला आवडतं म्हणून एकत्र येणं हे फक्त मैत्रीतच घडतं..
आई वडील, नवरा, मुले कसेही असले तरी गोड मानून घ्यावे लागतात..पण मैत्री मात्र फक्त आपली इच्छा आहे म्हणून असते, आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने न लादलेले आणि कुठलीही बंधन नसलेलं हे नातं आहे.

पुरुष आपली मैत्री नेहमीच टिकवून असतात, एकमेकांच्या मदतीला धावून जातात, स्त्रियांना मात्र आपलं घर, संसार सांभाळून, सर्वाना वेळ देऊन मग कधीतरी वेळ उरलाच तर मैत्रीणिना द्यावा लागतो..
मैत्रीण अडचणीत असली तरी तिला बरेचदा मदत करू शकत नाही..
कॉलेजमध्ये असताना एक मित्र म्हणाला होता, तुमची मुलींची मैत्री फक्त बोलण्यापुरतीच असते..
कधी प्रत्यक्ष हातातील सर्व टाकून गेलाय
का मैत्रीणिसाठी? पण मला वाटतं... मैत्रीणिना ही हतबलता सुद्धा समजून घेता येते, म्हणूनच हाकेला धावून न येणाऱ्या मैत्रीणिचाही राग येत नाही, तर उलट तिच्यासाठीच वाईट वाटतं..!

मैत्रिणीनो,
तुम्हाला एक सांगावेसे वाटते... कितीही व्यस्त असलात, तरी कधीतरी एक फ़ोन मैत्रिणीला कराच.... तुमची दुःख जिथे चवीने चर्चिले जाणार नाही, असे एक तरी ठिकाण असेल..नाही येणार ती धावून कदाचित,
पण जखमेवर तिची फुंकर तरी नक्की असेल.


यावर अधिक वाचा :

परमार्थातही चातुर्य असावे

national news
“एकदा रावणाला सेवकाने सांगितले की, तुमचा भाऊ बिभिषण दारात रांगोळीवर "राम" हे नाव काढतो. ...

आमिरवर आली अशी स्थिती बसला गाढवावर

national news
अभिनेता आमीर वर गाढवावर बसण्याची वेळ आली असून त्यानेच ती शेअर केली आहे. झाले असे की ...

'बॉइज २' मधून गिरीश कुलकर्णी करणार 'तोडफोड'

national news
'बॉईज' सिनेमातले आयटम सॉंग म्हंटले कि, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लीओनीची ठसकेदार लावणी ...

रुदालीच्या निर्मात्या कल्पना लाज्मी यांचे निधन

national news
चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या आणि पटकथालेखिका कल्पना लाज्मी ( ६४) यांचे मुंबईतील ...

सॅन मरिनो

national news
रोमन साम्राज्यातून हद्दपार झालेल्या आणि पळून आलेल्या अनेक लोकांनी याच गावात आश्रय घेतला. ...