testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

तीची पर्स

Last Modified गुरूवार, 29 नोव्हेंबर 2018 (12:17 IST)
तिच्या पर्समधून मोबाईल ची रिंगटोन वाजत होती.
ती शाळेतून नुकतीच येऊन चहा करत होती..
"फोन रिसिव्ह कर" त्याने रागानेच तिला म्हटलं.
"मी जरा कामात आहे. कोणाचा आहे तो तुम्ही पहा." ती शांतपणे म्हणाली.
शेवटी मोबाईल घेण्यासाठी त्याने पर्स हातात घेतली तर तो मोबाईल नेमका कोणत्या कप्प्यात आहे, हे काही त्याला समजेना.

मध्येच त्याच्या हाताला गोळ्यांचे पॅकेट लागलेे, तर मधूनच पिना, आरसा, रुमाल, पावडर, बॉटल, फुले, पेन, चाव्या, ह्या
वस्तू लागल्या. दुसऱ्या कप्प्यात हात घालेपर्यंत एक पुस्तक अन डायरी हाताला लागली. पर्सच्या छोट्याशा कप्प्यात चॉकलेटस् ठेवली होती.

खरं म्हणजे त्याने मोबाईल शोधायला पर्समध्ये हात घातला होता. पण त्याला त्याचवेळी अनेकगोष्टी हाती आल्या.
त्याचा हात कळतनकळत स्वतःच्या खिशाकडे गेला तर त्याच्या खिशात नोटांशिवाय काहीच नव्हते. तो विचार करू लागला,
खरंच पर्समधील मोबाईलप्रमाणे तिच्या मनाचाही कधीच थांगपत्ता लागत नाही. नेमके तिला काय हवे आहे याचाही ती पत्ता लागू देत नाही. सर्वांची काळजी घेणे एवढेच तिला ठाऊक असते.

पर्समधील डायरीत सर्व गोष्टींच्या नोंदी तिने ठेवलेल्या असतात, तर मुलांना खुश ठेवण्यासाठी छोट्याशा कप्प्यात ती चॉकलेटही ठेवते. कधी बरे वाटत नाही असे म्हणेपर्यंत हातात तिने चटकन गोळी ठेवलेली असते. आणि त्याचबरोबर स्वतःचीही ती तशीच काळजी घेते. तिच्या पर्समध्ये कायमच रुमाल,आरसा आणि पावडर ही असतेच. सर्व टेन्शनपासून स्वतःला खुश ठेवण्यासाठी तिने स्वतःस पुस्तकवाचना सारखे छंदही जोपासले आहेत.

आणि आपण काय करतो, तर सतत खूप काम आहे ह्या
सबबीखाली आळशी बनत असतो. प्रत्येक कामाची तिच्याकडून अपेक्षा करून स्वतःस अपंग बनवीत असतो.
आज तिची पर्स त्याला बरेच काही सांगत होती. ही पर्सच तिच्यासाठी बऱ्याच वेळा आधार असते.

ज्यावेळेस ती एकटीच कुठेही जाते त्यावेळेस मात्र पर्सला तिने घट्ट धरून ठेवलेले असते. साडी, ड्रेस अथवा इतर कोणताही पेहराव तिने घातलेला असो, पण तिच्या सोबतीला पर्स ही कायम असतेच.

तिच्या पर्सचे विविध कप्पे तिच्या मनाची उकल करत असतात.
बऱ्याच वेळा तिने अडकवलेली लॉंगपर्स ती बिनधास्त, तेवढीच धीट आहे असंच सांगत असते, तर तिच्या बघलेतील मोठी पर्स, त्या मधील सामान अनेक जबाबदाऱ्यांचे सहज स्पष्टीकरण देत असते.
जर एखाद्या स्त्रीच्या स्वभावाचा अथवा मनाचा तळ शोधायचा असेल तर प्रत्येक पुरुषाने तिची पर्स नक्कीच एकदा तरी पहावीच.........!!!


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

बॉलीवूडने नाकारले पाकिस्तानी कलाकार, आता येथे काम मिळणे ...

national news
ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (एआयसीडब्ल्यूए) ने पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी ...

सोनमनं सोशल मीडियावर बदललं आपलं नाव

national news
बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर नेहमीच आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत असते. आतादेखील तिने ...

वन लाइनर मराठी जोक्स

national news
जेव्हा तुमच्या अंतरात्म्याचा आवाज तुम्हाला सोडून सगळ्यांना ऐकू जातो त्याला घोरणे

मराठी मुलीच्या गालावर हात फिरवल्यास...

national news
तरुण मुलीच्या गालावरुन गुलाबाचे फुल फिरवल्यास... इंग्रजी मुलगी: यु आर नॉटी ...

आला रे आला चांदणं रातीला शिमगा आला ...

national news
होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत कोकणात शिमगा साजरा केला जातो आणि हा सण साजरा करण्यासाठी ...