शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालगित
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जून 2022 (09:07 IST)

बालगीत - अश्शी सुट्‌टी सुरेख बाई

kids poem
अश्शी सुट्‌टी सुरेख बाई
हिरवळ दाटे चोहीकडे !
वहया-पुस्तके-दप्‍तरबिप्‍तर
नाही आठवत कुठे पडे !
अश्शी सुट्‌टी सुरेख बाई
 
सूर्यच उशिराने उठतो
डोळे उघडून बघते मी, तर
"चल गप्पा मारु" म्हणतो !
अश्शी सुट्‌टी सुरेख बाई
 
चंगळ होते खाण्याची
सुस्ती येता होऊन जाते
टंगळमंगळ कामाची
अश्शी सुट्‌टी सुरेख बाई
 
हवेत येई गंमतजंमत
किती खेळलो तरी आपले
हात-पाय नाही दमत-थकत
अश्शी सुट्‌टी सुरेख बाई
 
पंख फड्‌फड्‌त उडून जाते
माझ्या हाती आठवणींची
रंगित रंगित पिसे ठेवते !
 
कवी - अनंत भावे