1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: बुधवार, 13 मे 2015 (16:28 IST)

लोभी कुत्रा

एकदा एका कुत्र्याला खूप भूख लागली होती. तेव्हाच त्याला रस्त्यात एक पोळी सापडली. तो ती पोळी एकटी खाऊ इच्छित होता म्हणून तो सगळ्यांची नजर चुकवून आपल्या तोंडात पोळी दाबून नदीवर निघून गेला.

नदीवरील पुल पार करताना त्याला स्वत:ची सावली दिसली. त्या सावलीला तो दुसरा कुत्रा समजून त्याच्या तोंडातील पोळी हिसकावण्याचा विचार करू लागला.

त्या सावलीची पोळी खेचण्याच्या नादात त्याने भूंकून नदीत उडी मारली. तोंड खोलत्याक्षणी त्याचा तोंडातली पोळी पाण्यात पडून गळून गेली. अशाने तो लोभी कुत्रा उपाशी राहिला.
 
शिक्षा: लोभ करू नये.