कहाणी अकबर बिरबल आणि जादूचा गाढव

kids story
Last Modified शुक्रवार, 5 मार्च 2021 (19:30 IST)
एकेकाळी बादशहा अकबर ने आपल्या बेगमच्या वाढदिवसाला एक अतिशय सुंदर आणि मौल्यवान हार भेट म्हणून दिला. त्यांना तो हार खूप आवडला. त्यांनी हार घातला आणि रात्री तो एका पेटीत काढून सांभाळून
ठेवला. बरेच दिवस झाले. त्यांनी तो हार घातला नाही. एके दिवशी त्यांनी
तो हार
घालण्यासाठी पेटी उघडली तर काय त्यात हार नव्हते. त्यांनी सगळी कडे शोधले पण त्यांना काही तो हार सापडेना. शेवटी त्यांनी ही गोष्ट बादशहा अकबर ला सांगितली. त्याने आपल्या सैनिकांना हार शोधायला सांगितले पण कुठेच हार सापडेना. बादशहाला समजले की हार चोरीला गेला आहे.
त्यांनी बिरबलाला दरबारात येण्यास सांगितले आणि हार चोरी गेल्याचे सांगितले. आता तो हार आपणचं शोधा असे ही म्हणाले. वेळ ना गमावता लगेच बिरबलाने राजमहालात काम करणाऱ्या सर्व सेवकांना दरबारात हजर होण्यास सांगितले. दरबारात ते सर्व कामगार आले परंतु बिरबलांचा कुठे ही पत्ता नव्हता. सर्व बिरबलाची वाट बघत होते. तेवढ्यात बिरबल आपल्या सह एक गाढव घेऊन आले आणि म्हणाले की हा माझा मित्र आहे आणि हा गाढव सामान्य नसून जादुई आहे. ह्याचा कडे जादूची अशी शक्ती आहे ज्यामुळे बेगमचा हार कोणी चोरला आहे ते कळेल.
नंतर बिरबल त्या गाढवाला एका जवळच्या खोलीत जाऊन बांधून येतो आणि येऊन म्हणतो की आता सर्व कामगारांनी एक एक करून त्या खोलीत जावे आणि या गाढवाची शेपूट धरून जोराने ओरडावे की "बादशहा मी हार चोरी केला नाही. आणि हा आवाज या दरबार पर्यंत आला पाहिजे. सर्वानी असे केल्यावर तो गाढव स्वतःहून सांगेल की चोर कोण आहे. आणि हार कोणी चोरला आहे.

सर्व कामगार एकएक करून त्या खोलीत जातात आणि गाढवाची शेपूट धरून जोरात ओरडतात "बादशहा मी चोरी केली नाही".
सर्व जाऊन आल्या वर बिरबल त्यांना त्यांचे दोन्ही हात पुढे करण्यास सांगतात आणि त्या हाताचा वास घेतात. वास घेत घेत ते एका सेवक जवळ येऊन
त्याचे हात धरून जोरात ओरडतात की बादशहा हुजूर "हाच आहे तो चोर. " बादशहा त्यांना म्हणतात ''बिरबल आपल्याला कसे समजले की हाच चोर आहे" एवढ्या विश्वासाने कसे सांगत आहात. "आपल्या त्या जादुई गाढवाने ह्याचे नाव सांगितले आहे. "

बिरबल म्हणाले की
बादशहा हा सामान्य गाढवच आहे हा काही जादुई गाढव नाही. मी त्याच्या शेपटीला सुवासिक द्रव्य लावले होते. ज्यांनी त्याचा शेपटीला धरले त्यांच्या हाताला तो सुवासिक वास येत होता. पण ह्याने शेपटीला धरलेच नाही म्हणून ह्याच्या हाताला तो वास येत नाही.
अशा प्रकारे बिरबलाच्या चातुर्याने चोर आणि बेगम चा हार देखील सापडला. बिरबलाच्या चातुर्याचे सर्वानी कौतुक केले.


शिकवण- या कथेमधून शिकवण मिळते की वाईट कामाला किती देखील लपविले तरी ते एकेदिवशी सर्वांच्या सामोरी येत. म्हणून कधीही वाईट काम करू नये.यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांची तातडीने होणार भरती

दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांची तातडीने होणार भरती
कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता सध्या जाणवत आहे. त्यासाठी ...

प्रभु श्रीरामाने तालुडीला दिली अनोखी भेट

प्रभु श्रीरामाने तालुडीला दिली अनोखी भेट
जेव्हा रावण अपहरण सीतेलं लंकाकडे घेऊन गेला तेव्हा सीतेला वापर आणण्यासाठी श्रीरामांना ...

हसत राहा, तारुण्य टिकवा

हसत राहा, तारुण्य टिकवा
तरुण दिसणे कोणाला आवडणार नाही. पण यासाठी केवळ मेकअपचं एकमेव पर्याय नाही. आपण आनंदी असाल ...

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी हे आसन प्रभावी

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी हे आसन प्रभावी
आज आम्ही गर्भवती होण्याची इच्छा बाळगत असलेल्या महिलांसाठी आवश्यक माहिती देत आहोत. फॅमिली ...

लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात या गोष्टींचा ...

लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात या गोष्टींचा समावेश करा
अनेक लोक वाढत्या वजनामुळे काळजीत असतात, अशात डायटिंग, व्यायाम, प्रोटीन शके आणि अनेक उपाय ...