शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: सोमवार, 1 मार्च 2021 (20:28 IST)

बोथ कथा :बेईमानीची शिक्षा

एका नगरात एक पुजारी राहत होता. त्याच्या कडे लोकं वस्तू ठेवी म्हणून ठेवत होते. तर तो लोकांच्या वस्तू परत देत नव्हता. 
एकदा त्या गावाचा एक माणूस त्याच्या कडे आपली काही पैशाची पिशवी ठेवी म्हणून ठेवून परदेशी गेला. त्या माणसाने परत येऊन आपली ठेवलेली पैशाची पिशवी मागितली. त्या वर त्याने सरळ नकार दिले की माझ्याकडे तुझी कोणतीही वस्तू ठेवी म्हणून नाही. त्या माणसाने राजाच्या मंत्र्याकडे तक्रार केली. मंत्री ने राजाला सर्व  सांगितले. राजाने पुजारीला बोलवून त्या माणसाची वस्तू देण्यास सांगितले. त्यावर महाराज माझ्या कडे ह्याची कोणतीही वस्तू नाही हा उगाचच मला बदनाम करत आहे. माझ्या वर खोटे आरोप लावत आहे. ह्याने माझ्या कडे ठेवायला काहीच दिले नाही. 
राजाने त्या माणसाला विचारले तेव्हा राजा ला समजले की पुजारी खोटं बोलत आहे आणि लुबाडत आहे. पुजारी खोटारडा आहे तो बेईमानी करत आहे.    
 एके दिवशी राजाने त्या पुजारील चौसर खेळायला बोलाविले. खेळताना राजाने आपली अंगठी त्याच्या अंगठीसह बदलून दिली आणि गुपचूप पद्धतीने आपल्या एका सैनिकाला त्या पुजारीच्या घरात पाठवून त्याच्या बायको कडून पुजारीने पैसे मागविले आहे असं सांगून पैसे आणायला सांगितले. 
आपल्या पतीच्या नावाची अंगठी बघून पुजारीच्या पत्नीने रुपयाची तीच पिशवी नेऊन सैनिकाला दिली जी त्या माणसाने त्याच्या कडे ठेवली होती. राजाने त्या माणसाला बोलावून इतर पिशव्या ठेऊन त्यामधून पिशवी ओळखून घेण्यास सांगितले. त्या माणसाने अचूकपणे आपली पिशवी ओळखली. अशा प्रकारे त्या माणसाला त्याची पैशाची पिशवी मिळाली आणि त्या पुजारीला राजाने इतरांना लुबाडण्यासाठी आणि त्याच्या बेईमानीची शिक्षा दिली.
 
तात्पर्य - पैशाच्या लोभामुळे बेईमानी कधी ही करू नये.