शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालकथा
Written By
Last Modified: शनिवार, 26 एप्रिल 2014 (15:33 IST)

काजवा का चमकतो?

मित्रांनो, तुम्ही अंधारात काजवा चमकताना कधी पाहिलाय का? प्रत्यक्ष पाहिला नसला तरी त्याच्या गोष्टी तरी नक्की ऐकल्या किंवा वाचल्या असतील. काजवाच्या चमकण्यामागचा मुख्य उद्देश आपल्या जोडीदाराला आकर्षित करुन घेणं आणि आपलं अन्न शोधणं हा असतो. आता शहरांमध्ये काजवे कमीच पाहायला मिळतात. ग्रामीण भागात मात्र ते मोठय़ा संख्येने दिसतात. 

या प्रकाशाने चमकणार्‍या काजव्यावर 1967 मध्ये रॉबर्ट बायल यांनी संशोधन केलं होतं. काजव्यांच्या शरीरात फॉस्फरस असतो असं आधी मानलं जात होतं. त्या फॉस्फरसमुळे काजवा चमकतो असं पूर्वी म्हटलं जायचं. पण, काजवा फॉस्फरसमुळे नाही तर त्याच्या शरीरातील बल्किल्युसिफेरेस नावाच्या प्रोटीनमुळे तेज पसरवू शकतो हे जर्मनीच्या या वैज्ञानिकानं सिद्ध करुन दाखवलं. काजव्याचा प्रकाश प्रखर नसला तरी हजारो काजवे एकत्र येतत तेव्हा तो परिसर उजळून जातो. काजवे रात्रीच चमकतात. 

काजवे दिसायला अगदी बारीक आणि दोन पंख असणारे कीटक असतात. ते जंगलामध्ये झाडाच्या ढोलीत अंडी घालतात. काजव्याप्रमाणेच चमकणारे अनेक जीव आहेत. काजव्याप्रमाणे चमकणार्‍या अशा एक हजार प्रजातींचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी काही प्रजाती पृथ्वीवर तर काही प्रजाती समुद्राच्या खोल पाण्यात आढळतात.