शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By वेबदुनिया|

पाहुणे जावई

ईश्वर नावाचा एक सद्‍गृहस्थ विकण्टक नावाच्या शहरी रहात होता. एकदा त्याच्याकडे त्याचे चार जावई रहायला आले. ईश्वराने आदराने त्यांचे स्वागत केले. त्यांची जेवण्याखाण्याची व्यवस्थाही चोख ठेवली. पण सहा महिने झाले तरी एकही जावई जाण्याचे नाव काढेना. तेव्हा ईश्वराने बायकोच्या सहाय्याने त्यांना हाकलण्याचे ठरवले, ''आज जेवणाच्या वेळी त्यांना हातपाय धुवायला पाणी देऊ नकोस, म्हणजे अपमान केला समजून ते निघून जातील.''

तसे ईश्वराच्या बायकोने केल्यावर एक जावई निघून गेला. दुसरा लहान पाट जेवण्यसाठी ठेवला म्हणून गेला. तिसरा शिळे अन्न पानात वाढले, म्हणून गेला. याप्रमाणे तिन्ही जावई निघून गेले पण चौथा जावई जाण्यास तयार नव्हता. तेव्हा त्याला मात्र गचांड्या देऊनच ईश्वराने घराबाहेर काढले.

तात्पर्य : एखाद्या व्यक्तीच्या चांगुलपणाचा किती फायदा घ्यावा हे आधीच ओळखून असावे अन्यथा पदरी अपमानच येतो.