शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. बालकथा
Written By वेबदुनिया|

सुपरमॅनच्या कॉमिकला एक कोटीची बोली

WD
सुपरमॅनची पहिली झलक दाखविणार्‍या कॉमिक बुकची 70 वर्षापूर्वीची पहिली प्रत अपघातानेच मिळाली असून हा दुर्मीळ पुस्तकाला लिलावात 1,75 हजार डॉलर्स म्हणजे 1 कोटी 1 लाख रूपयांची बोली मिळाली असल्याचे कॉमिक कनेक्ट डॉट कॉमचे स्टीफन फिशलर यांनी जाहीर केले आहे. या पुस्तकाचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला. ग्राहकाचे नांव जाहीर करण्यात आलेले नाही मात्र तो कॉमिक बुक कलेक्टर असल्याचे सांगितले गेले आहे. स्टीफन या लिलावाविषयी बोलताना म्हणाले की, या पुस्तकासाठी 51 ऑफर्स आल्या होत्या. 1938 साली छापल्या गेलेल्या या कॉमिकच्या जगभरात केवळ 100 प्रती शिल्लक असाव्यात असा अंदाज आहे. त्यामुळे हे पुस्तक दुङ्र्कीळ समजले जाते. मिनिसोटा विभागात एका घराची दुरूस्ती करताना डेव्हीड गोंझलेस याला घराच्या सिलिंग इन्शुलेटरमध्ये हे पुस्तक दिसले. डेव्हीडला या पुस्तकाबाबत विशेष उत्सुकता वाटली नव्हती. ते त्याने कचर्‍यात फेकूनच दिले होते मात्र कॉमिकचा नाद असलेल्या त्याच्या आत्याने पुस्तकाचे मोल जाणून ते योग्य ठिकाणी पोहोचविले व नंतर ते लिलावात विकण्यात आले.