शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: बुधवार, 3 मार्च 2021 (09:30 IST)

किचन टिप्स :स्वयंपाकघराची स्वच्छता करण्यात प्रभावी लिंबू

लिंबू  आंबट चव मुळे सगळ्यांनाच आवडतो या मध्ये ब्लिचिंगचे गुणधर्म असल्यामुळे हे स्वयंपाकघरात देखील कामी येत. चला तर मग लिंबाचे गुणांबद्दल जाणून घेऊ या 
 
1 मायक्रोव्हेव स्वच्छ करण्यात लिंबाचा वापर-
एक कप पाण्यात लिंबाचे तुकडे ठेवून 15 मिनिटे मायक्रोव्हेव गरम करा नंतर हे काढून मायक्रोव्हेव स्वच्छ कपड्याने पुसून घ्या.
 
2 चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी -
भाजी चिरायचा चॉपिंग बोर्ड स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा तुकडा या वर चोळा डाग आणि वास नाहीसे होतील.
 
3 सिंक स्वच्छ करायला -
लिंबाला पिळून एक घट्ट पेस्ट बनवा आणि साबणाच्या घोळात मिसळून सिंक स्वच्छ करा.सिंक चकचकीत होईल.
 
4 कपड्यावरील डाग काढते- 
कपड्यांवरील डाग काढण्यासाठी कपड्यावर लिंबू कापून चोळून घ्या  नंतर कापड उन्हात वाळत घाला. 
 
5 खिडक्यांचे काच स्वच्छ करण्यासाठी -
लिंबाने खिडक्यांचे काच तसेच गाडीचे काच, कपाटाचे काच देखील स्वच्छ करू शकता