तुझे रूप सखे गुलजार असे

Widgets Magazine

love
तुझे रूप सखे गुलजार असे
काहूर मनी उठले भलत
दिनरात तुझा ग ध्यास जडे
हा छंद जिवाला लावि पिसे !

ती वीज तुझ्या नजरेमधली
गाली खुलते रंगेल खळी
ओठांत रसेली जादुगिरी
उरि हसति गुलाबी गेंद कसे !

नखऱ्यांत तुझ्या ग मदनपरी
ही धून शराबी दर्दभरी
हा झोक तुझा घायाळ करी
कैफात बुडाले भान असे !

ती धुंद मिठी, बेबंद नशा
श्वासांत सखे विरतात दिशा
बेहोश सुखाच्या या गगनी
मी आज मला हरवून बसे !



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

लव्ह स्टेशन

news

गर्लफ्रेंड पजेसिव्ह असल्यास या गोष्टी अजिबात करू नका!

प्रेमात पडणं तसं फार सरळसोपं आहे. पण गोडगुलाबी धुंदीमध्ये जर तुम्ही अगदीच पजेसिव्ह ...

news

पाच कारणं.. ‘ती’ मेसेजना रिप्लाय का देत नाही?

जगभरातील तमाम तरुणांना एक प्रश्न कायम सतावत असतो, तो म्हणजे ‘ती’ मेसेजचा रिप्लाय का देत ...

news

या 10 गोष्टींमुळे कळेल की आपण प्रेमात पडलायं का?

आपल्याला राहून- राहून कुणाची तरी आठवण येते, फक्त त्या व्यक्तीच्या विचारात दिवस-रात्र सरत ...

news

आपल्या व्हॅलेंटाईनच्या राशीनुसार द्या गिफ्ट

व्हॅलेंटाईन डे ला आपल्या प्रेयसी/प्रियकराला खूश करण्यासाठी गिफ्ट दिली जातं. हा प्रकार ...