सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

चारचौघात असली तरी असे अट्रॅक्ट करू शकता तिला...

मुलीला एकट्यात भेटावी यासाठी आधी तिला चारचौघात असतानाच आपल्याकडे आकर्षित करणे गरजेचे आहे. बघा काही टिप्स तिला पटवण्यासाठी:
 
हसली की पटली
हा फंडा किती जरी जुना असला तरी प्रभावी आहे. सगळ्यासोबत असतानाही तिच्याशी नजर मिळवताना एक रोमँटिक हसू आपलं काम करू शकतं. आपल्या डोळ्यात आणि हसण्यात रोमांस जाणवला की ती लगेच काही रीऍक्ट करेल. तिला आकर्षण असल्यास ती पुन्हा नजर मिळवून स्माईल देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.
 
किंचित कौतुक
इम्प्रेस करण्यासाठी उगाच कौतुक करत बसू नये. केवळ एका वाक्यात प्रामाणिक स्तुतीमुळे तिचं मन जिंकता येईल. मग ते कौतुक तिच्या दिसण्यावर नसून तिचे विचार किंवा आयडियाजवर असलं तरी आपलं काम होईल.
 
ड्रेसिंग सेंस
स्वत: नेहमी टिपटॉप राहावे. आपण देखणे असला तरी राहणी व्यवस्थित असली की मुली पटकन इम्प्रेस होतात.
 
खोटं बोलणे टाळा
आकर्षित करण्याच्या नादात शोऑफ करणे चुकीचे ठरेल. आपल्या तिच्यासोबत वेळ घालवण्याची इच्छा असेल तर स्वत:बद्दल खोटं मांडू नका. हवं तर कमी बोला पण खरं बोला.
 
थट्टा पण मर्यादित
मुलीला आकर्षित करण्यासाठी सेंस ऑफ ह्यूमर असणे आवश्यक आहे परंतू अती थट्टा नको. तिचा स्वभाव कळत नाही तोपर्यंत मर्यादा पाळावी. आणि पर्सनल कमेंट्स टाळावे.