शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

ऑनलाईन डेटिंग करताय! मग जाणून घ्या हे 9 खोटं

हल्ली गुपचुप नजर मिळवून एकमेकाला प्रेमाचे संकेत देण्याचे दिवस सरले. नवी तकनीक या सर्व इमोशन्सवर भारी असून आता सर्व काम ऑनलाईन होतात. कित्येकदा डेटिंगसाठीही प्रत्यक्ष भेट होत नसून सरळ ऑनलाईन डेटिंग करतात. पण त्यातील इमोशन्स किती खरे आणि किती खोटे आहे हे इमिटिकॉन बघून ठरवणे योग्य नाही.
 
अलीकडे डेटिंगच्या नावावर एकमेकाला मूर्ख बनविण्याची स्पर्धाच चालू आहे असे म्हटले तरी हरकत नाही. सर्वात जास्त खोटं डेटिंग साईट्सवर बोललं जातं. चला पाहू 9 सर्वोच्च खोटं जे ऑनलाईन डेटिंगवर बोलण्यात येतात.

फेक फोटो शेअर करणे: ऑनलाईन डेटिंगमध्ये धोका देणारा व्यक्ती स्वत:चे मोजून निवडलेले कमीत कमी फोटो शेअर करतो. कारण नियत खोटी असते. कित्येकदा व्यक्ती स्वत:ऐवजी एखाद्या सुंदर व्यक्तीची फोटो शेअर करायलाही पुढे मागे बघत नाही. 

वय लपवतात: हे तर फार कॉमन खोटं आहे. आपलं खरं वय कोणताही मुलगा किंवा मुलगी शेअर करत नाही.
 
कुटुंबाबद्दल खोटी माहिती: मुलांना माहीत असतं की मुली जरा इमोशनल असतात आणि कुटुंबाशी जुळलेल्याही. म्हणून ते स्वत:चे आदर्श आणि खूप सुखी कुटुंब असल्याची माहिती देतात ज्याने मुलगी इम्प्रेस होऊन त्याच्या प्रेमात पडावी.

फेव्हरेट लिस्ट: अनुभवी किंवा लग्न झालेल्या मुलांना मुलींची काही कॉमन आवड निवड माहीत असते आणि या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करून ते समोरच्याचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतात.
 
मी फिट आहे: मी जिम करतो, खाण्या-पिण्याकडे लक्ष देतो असे वाक्य प्रयोगात आणून मुलं अधून-मधून स्वत: फिट असल्याची जाणीव करवत असतात. कारण मुलींना फिट आणि स्मार्ट मुलं आवडतात हे तर जगजाहीर आहे.

व्यवसायाबद्दल: डेटिंग साईटवर मुलं स्वत: ची नोकरी किंवा व्यवसायाला जरा जास्तच इंप्रेसिव्ह बनवून प्रस्तुत करतात. मुलींना आवडणारे क्षेत्र किंवा ज्यात कमाई जास्त होत असेल अश्या क्षेत्रात किंवा पदावर स्वत: आसीन असल्याचे सांगतात.
 
मी फेव्हरेट आहे: रिअल लाईफ मध्ये भलेही कोणी लक्ष देत नसेल पण डेटिंगमध्ये असे दर्शवण्यात येतं की आपल्याला विचारल्याशिवाय दुनियेतील कोणताच व्यक्ती निर्णय घेण्यात अक्षम आहे.

पहिली डेटिंग: मी पहिल्यांदाच डेटिंग करत आहे हे खोटं तर खूपच कॉमन आहे. अशाने प्रत्येकाला वाटतं की समोरचा लगेच इम्प्रेस होईल.
 
इमोशनली ब्लॅकमेल: जेव्हा एखादं खोटं उघड पडलं की ती व्यक्ती जीवनातील काही ‍तरी किस्से गढून अशी कहाणी प्रस्तुत करेल की समोरचा इमोशनली त्यात गुंतून जाईल आणि कधी नसलेली समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायला लागेल.