बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

फ्राइड फिश

साहित्य : 675 ग्रॅम कोड मासोळीचे साफ तुकडे, 1 कापलेला कांदा, 1 मोठा चमचा लिंबाचा रस, 1 चमचा मीठ, 1 चमचा लसुणाच गोळा, 1 चमचा तिखट, दीड चमचा गरम मसाला, 2 चमचे धने पूड, 2 मोठे कापलेले टोमॅटो, 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोर, 3/4 कप तेल.

कृती : मासोळीचे तुकड्यांना थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावे. कांदा, टोमॅटो, लिंबाचा रस, मीठ, लसूण, गरम मसाला, तिखट आणि धने पूड हे सर्व साहित्य मिक्सरमधून काढून त्याची पेस्ट तयार करावी. मासोळीच्या तुकड्यांना फ्रीजमधून काढून एका प्याल्यात ठेवावे. त्यावर दळलेला मसाला आणि कॉर्नफ्लोर घालून चांगले हालवावे. एका कढईत तेल गरम करून आणि मासोळीच्या तुकड्यांवर कॉर्नफ्लोर लपेटून पकोड्यासारखे तळून काढावे. हिरवी चटणी व पराठ्यांसोबत गरम गरम वाढावे.