शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By वेबदुनिया|

मराठी पाककृती : चिकन फ्राय

साहित्य- अर्धा किलो चिकनचे छोटे तुकडे, दोन लिंबू, दोन चमचे मिरची पावडर, धणे पावडर, अर्धा चमचा हळद, एक चमचा आलं लसूण पेस्ट, दोन मोठे चमचे चण्याचं पीठ. 

कृती- चिकनला लिंबू व मीठ लावून अर्धा तास मॅरीनेट करून ठेवावे. त्यानंतर वरील सर्व मसाले टाकावेत. या सर्व मिश्रणाला नंतर फोडणी द्यावी. फोडणी देताना हे चिकन डिप फ्राय होईल याची काळजी घ्यावी. हे सर्व करतांना त्यावर लिंबू व चाट मसाला टाकून गरम गरम सव्‍‌र्ह करावे. (हे चिकन नुसते खाण्यास अतिशय उत्तम. किंवा पावाबरोबरही हे खाऊ शकतो.)