आषाढाच्या पहिल्या दिवशी...
अभिषेकी बुवांचं अगदी दुर्मिळ गाणं..
आषाढाच्या पहिल्या दिवशी
अवचित दिसशी मला
म्हणूनिया, विनवित मेघा तुला॥
तप्तांचा तू असशी आश्रय
इंद्रसचिव तू , तू करुणामय
निरोप माझा घेऊनी जाई अलकानगरीला
म्हणूनिया, विनवित मेघा तुला॥
प्रिया दूर मम, तिला भेटशील
मंदातटे नाहीन म्हणशील
विफल विनवणी सुजनी बरवी
नको शठी सफला
म्हणूनिया, विनवित मेघा तुला॥
कुठला घ्यावा मार्ग प्रथम तो?
सांगूनी नंतर निरोप कथितो
दूत होवूनी पोचीव माझा
दुःखी दयितेला
म्हणूनिया, विनवित मेघा तुला॥