Widgets Magazine
Widgets Magazine

कवितासागर साहित्य अकादमीचे पुरस्कार

Last Modified सोमवार, 26 सप्टेंबर 2016 (11:31 IST)
महाराष्ट्रातील एक अग्रगण्य साहित्य संस्था असलेल्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत भरीव योगदान देऊन स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणा-या ‘कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर’ या संस्थेतर्फे कादंबरी, कवितासंग्रह, प्रातिनिधिक कवितासंग्रह, संपादित कवितासंग्रह, कथासंग्रह, संपादित ग्रंथ, समीक्षा, धार्मिक वाङमय, बाल वाङमय, संत वाङमय, कुमार वाङमय, नाटक, संशोधन, नाट्य समीक्षा, इतिहास विषयक इत्यादी व अन्य साहित्य प्रकारास पुरस्कार दिले जातात. कोणत्याही वर्षी प्रकाशित झालेली व कोणतीही आवृत्ती असलेली पुस्तके पुरस्कारासाठी पाठवता येतील. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत प्रकाशित झालेल्या विविध साहित्यकृती या पुरस्कारांसाठी विचारात घेतल्या जातात. छापील स्वरुपात प्रकाशित झालेल्या ग्रंथांच्या ३ प्रती लेखक / प्रकाशक यांनी पाठवाव्या. सोबत लेखकाचा पासपोर्ट साईज फोटो, साहित्यिक परिचय, ग्रंथांच्या ३ प्रती इत्यादी विवरणासह ३१ मार्च पर्यंत पाठवावे. आपली प्रवेशिका पाठविण्यासाठी प्रवेश शुल्क किंवा अन्य कोणत्याही प्रकारचे शुल्क नसून प्रवेशिका ही संपूर्णपणे नि:शुल्क आहे. पुरस्काराच्या वितरणा वेळीच आपण पाठविली तिन्ही पुस्तके तीन वेगवेगळ्या ग्रंथालयाला देण्यात येतील आणि त्याची अधिकृत पोच आपल्याला दिली जाईल. ऑनलाइन किंवा ई-बुक स्वरुपात प्रकाशित पुस्तके सुद्धा पाठविता येतील. त्यासाठी सदर पुस्तकाची पीडीएफ आणि ज्या वेबसाईटवर पुस्तक प्रकाशित झाले आहे त्याची आमच्या ईमेलवर पाठवावी आणि संबंधित पुस्तकाची बायंडिंग केलेली एक प्रिंट कॉपी, लेखकाचा पासपोर्ट साईज फोटो, साहित्यिक परिचय इत्यादी विवरणासह ३१ मार्च पर्यंत पाठवावे.


यावर अधिक वाचा :