शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: नाशिक , सोमवार, 12 सप्टेंबर 2016 (16:06 IST)

'ग्रंथ तुमच्या दारी’ तर्फे दुबईला पहिलाच वाचक मेळावा

महाराष्ट्र आणि नाशिकच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या 'ग्रंथ तुमच्या दारी' या उपक्रमांतर्गत पुस्तक वाचक चळवळीने साता समुद्रापार झेप घेतली आहे. 
 
विनायक रानडे यांची मुख्य संकल्पना असलेली ही चळवळ वाचक चळवळीचा मानबिंदू ठरली आहे. 'ग्रंथ तुमच्या दारी, दुबई' व 'आमी परिवार' यांच्या संयुक्त विद्यमाने भारताबाहेर होणारा पहिलाच वाचक मेळावा दुबई येथे होत आहे. या कार्यक्रमाला ८00 पेक्षा जास्त मराठी भारतीय हजर राहतील, असा अंदाज आहे. दुबईत २0१६ हे वाचन वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
 
'ग्रंथ तुमच्या दारी’ हे २0१४ मध्ये डॉ. संदीप कडवे व स्वाती कडवे यांनी ही योजना दुबईत नेण्यासाठी प्रयत्न केले होते. यामुळे पुस्तक पेटी संकल्पना  घीसीस दुबई, बर दुबई, बर दुबई सिल्वर सँड्स, इंटरनॅशनल सिटी दुबई, डिस्कव्हरी गार्डन दुबई, अल मझाज शारजा, अबू शगारा शारजा, अल खान शारजा, कासिमिया शारजा, रस अल खेमा, फुजेरा, अबू धाबी, अजमान वाचक मंडळ, बहरीन वाचक मंडळ, अल खोबर सौदी अरेबिया, सोहार ओमा येथे एकूण १६ पेट्या आहेत.
 
या पेट्यांचे प्रायोजक कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी विश्‍वस्त विश्‍वास ठाकूर, नाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे व मनीषा कारेगावकर हे आहेत. वाचक मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणो म्हणून कवी प्रा. प्रवीण दवणे व प्रमुख अतिथी म्हणून ग्रंथ तुमच्या दारीचे प्रवर्तक विनायक रानडे व विश्‍वास ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत.
 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाखा पंडित, अपर्णा पैठणकर, धनश्री पाटील, प्रचिती तलाठी, डॉ. सुप्रिया सुधालकर, सुजाता भिंगे, निखील जोशी, किशोर मुंढे, तसेच आमीचे संतोष करंडे, नितीन साडेकर परिश्रम घेत आहेत.