शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By wd|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 23 सप्टेंबर 2014 (11:45 IST)

ज्येष्ठ कविवर्य शंकर वैद्य यांचे निधन

मराठीतील ज्येष्ठ कविवर्य शंकर वैद्य यांचे आज (मंगळवारी) पहाटे निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्यावर काही दिवसांपासून मुंबईतील सुश्रुषा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर पार्थिवावर दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, आकाशवाणीवर त्यांच्या काव्य वाचणाच्या कार्यक्रमांनाही श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असायचा. 'आला क्षण, गेला क्षण' हा त्यांचा पहिला कथासंग्रह होता. वैद्य यांच्या अनेक कवितांना गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आवाजही दिला आहे. 'कालस्वर' हा शंकर वैद्य यांचा पहिला काव्य संग्रह होता.
 
वैद्य यांना बालपणी निसर्ग सोबतीला होता. त्यामुळे त्यांच्या कवितांमधूनही निसर्गाचे दर्शन मोठ्या प्रमाणावर होत गेले. त्यानंतर तब्बल 27 वर्षांनी त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.