शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 26 फेब्रुवारी 2015 (12:52 IST)

प्रा. मिरासदारांना ‘विंदा’ जीवनगौरव पुरस्कार

प्रा.द.मा.मिरासदार यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
 
भाषा विभागातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. श्री. पु. भागवत पुरस्कार केशव भिकाजी ढवळे प्रकाशन यांना जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. तर तीन लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे श्री. पु. भागवत पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
२७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मिरासदार यांनी कादंबरी, विनोदी कथा, वगनाट्य, चित्रपट संवाद, विविध विषयांवर लेखन केले आहे.