रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: मंगळवार, 23 मार्च 2021 (08:30 IST)

ऑफिसच्या कामामुळे मतभेद होत असल्यास हे करा

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक जण व्यस्त आणि तणावात आहे. ऑफिसच्या वाढत्या कामामुळे कोणीही कोणाला वेळ देऊ शकत नाही कामाच्या तणावामुळे आणि कामाचा व्याप वाढल्यामुळे आपण प्रियजनांना देखील वेळ देऊ शकत नाही. या मुळे जोडीदारामध्ये मतभेद आणि भांडणे होतात आणि नात्यात दुरावा येतो .हे टाळण्यासाठी काही टिप्स सांगत आहोत. जेणे करून आपसातील भांडणे कमी होतील. चला जाणून घेऊ या.
 
* किमान एक दिवस तरी बाहेर जा -आपण ऑफिसच्या कामामुळे घरच्यांना वेळ देऊ शकत नाही, परंतु आठवड्यातून किमान एक दिवस तरी कुटुंबासमवेत बाहेर फिरायला जा.जोडीदाराशी बोलून त्यांचे विचार जाणून घ्या. त्यांना वेळ देऊन आनंद द्या. असं करून आपले संबंध सुधारतील.   
 
* संभाषण सोडू नका- जरी आपण कामात व्यस्त आहात, आपण कुटुंबातील सदस्यांना वेळ देऊ शकत नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या जोडीदाराशी किंवा इतर कुटुंबियांशी बोलणार नाही. जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा त्यांच्याशी बोला. ऑफिसमध्ये लंच ब्रेक दरम्यान घरी कॉल करा किंवा जेव्हा आपण ऑफिसमधून घरी परतता  . तुम्ही सर्वांसोबत बसून थोडा वेळ बोला. हे आपल्याला आपल्या जोडीदारासह आणि कुटुंबाच्या जवळ आणेल.
 
* नेहमीच दोघांनी निर्णय घ्या- कोणतेही निर्णय एकट्याने न घेता दोघांनी किंवा घरातील इतर सदस्यांनी मिळून घ्यावे.असं केल्याने आपण एकमेकांना समजून घ्याल आणि घरातील प्रत्येक जण आपल्याला समजण्यास सक्षम होईल.एकट्याने निर्णय घेतल्यावर आपले संबंध खराब होऊ शकतात. 
 
* ऑफिसचा राग किंवा गोष्टी घरात सांगू नका- जेव्हा आपण काम करता तेव्हा आपण कामाच्या जास्त व्यापाला घेऊन रागात असता. तरी ही घरात कामाचा ताण येऊ देऊ नका. या मुळे घरातील वातावरण खराब होईल. तसेच जोडीदाराशी नातं देखील दुरावेल. म्हणून ऑफिसच्या कामाचा ताण घरात अजिबात आणू नका.