रविवार, 28 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (21:44 IST)

तारुण्याच्या काळात मुलांवर लक्ष देण्यासाठी हे करा

असे म्हणतात की मुले त्यांच्या पालकांशी अगदी जवळची असतात, ते कोणाशी बोलू शकतं नाही ते पालकांशी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांशी बोलतात. परंतु असे दिसून येते की मुलं वयात येताना किंवा तारुण्यात येताना त्यांच्यात अनेक शारीरिक मानसिक बदल होऊ लागतात. अशा परिस्थितीत मुलं आई-वडिलांपासून दूर एकांतवासात वेळ घालवतात. त्यांचे म्हणणे ऐकत नाही. त्यावेळी असं समजावं की मुलं आपल्या पासून दूर जात आहेत. या परिस्थितीत जागरूक राहणे आवश्यक आहे. या साठी  काही  मार्ग आपल्याला मदत करू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या.
 
* मुलांच्या खर्चाकडे लक्ष द्या-
तारुण्यावस्थेत जाताना मुलांच्या बऱ्याच गरजा असतात. त्यासाठी ते घरातून पैसे घेतात. मुलांनी त्यांच्या पालकांकडून पैसे घेणे वाईट नाही, परंतु ते त्या पैशासाठी काय विचार करीत आहे, ते त्या पैशांचा वापर चुकीचा तर करत नाही किंवा अतिरेकी खर्च तर करीत नाही, या कडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. ते काही चुकीचे तर विकत घेत नाहीत? ते पैसे आणि त्यांच्या वापरण्याकडे लक्ष दिले पाहिजे, आणि जेवढी गरज आहे तेवढेच पैसे मुलांना द्या.
 
* चुकीसाठी रागावू नका-
कोणतेही मुलं वयात आल्यावर त्याच्यात आत्मसन्मानाची भावना निर्माण होऊ लागते. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांच्यावर रागावले आणि तेही एखाद्याच्या समोर, तर तुमच्या रागावण्याचा त्यांच्या वर उलट परिणाम होऊ शकतो. तसेच आपल्या मुलाची दुसऱ्या समोर मस्करी किंवा निंदा नालस्ती करू नये. चूक कोणाशी देखील होऊ शकतं. त्याला रागावू नका त्याला समजावून सांगा विश्वास करा की, रागावण्यापेक्षा त्याला प्रेमाने समजावून सांगणे चांगला प्रकारे काम करेल.   
 
* मित्रांवर लक्ष द्या-
जसजसे मुलं मोठे होतात त्यांचे मित्र देखील वाढतात. प्रत्येकाला माहीत आहे की काही मित्र खूप चांगले असतात आणि काही खूप वाईट असतात. लहान वयातच मुलांना वाईट सांगत मिळाल्यामुळे ते वाईट बनतात. या मध्ये बरेच काही मित्रांच्या सहवासावर देखील अवलंबवून असते, म्हणून आपण आपल्या मुलांच्या मित्रांवर लक्ष द्या. आपल्या मुलाला किती मित्र आहे आणि ते कुठे राहतात त्याची सवय कशी आहे या सारख्या अनेक गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. जेणे करून आपले मुलं व्यवस्थित राहील.  
 
* मोकळीक द्या आणि विश्वास ठेवा -
तारुण्यात आल्यावर मुलांमध्ये हार्मोन्स मधील बदल झाल्यामुळे तो बऱ्याच गोष्टींचा विचार करण्यात सक्षम होऊ लागतो. म्हणून मुलांना डांबून ठेवण्या ऐवजी  मोकळीक द्या. या शिवाय मुलांवर विश्वास दाखवा. जर आपल्या मुलाने म्हटले की तो एकटाच कुठे जाऊ शकतो किंवा हे काम स्वतः करू शकतो. अशा परिस्थितीत मुलांवर विश्वास ठेवा आणि त्याला ते काम करू द्या.