testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Home Tips: सजावटीचा कानमंत्र

घरात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रसन्नता वाटावी तसेच घरातील सदस्यांची मनोवृत्तीही उत्साही राहावी यासाठी मोलाची भूमिका पार पाडते. सजावटीचे अवडंबर न करता माफक प्रमाणात केलेली सजावट घराला आल्हाददायकपणा देणारी ठरते. बदलत्या जीवनशैलीबरोबर सजावटीचे ट्रेंडही बदलत आहेत. त्यांचा वापर केला तर घराला प्रसन्न लूक देता येईल.
आपल्या घरात कोणी आलं की घर पाहून त्याला प्रसन्न वाटलं पाहिजे. घरात अशी प्रसन्नता आणण्यासाठी गृहसजावटीला फार महत्त्व आहे. घराच्या अंतर्गत सजावटीमध्ये रंगसंगती आणि फर्निचरबरोबर प्रकाशयोजना, अंतर्गत व्यवस्था, जास्तीत जास्त मोकळ्या जागेची व्यवस्था, सुशोभिकरण यासारख्या अन्य बाबीही महत्त्वाच्या ठरतात. अंतर्गत सजावट करताना उपलब्ध जागेचा विचार करावा लागतो. अंतर्गत रचनेमध्ये घराचं प्रवेशद्वार फार महत्त्वाचं आहे. सुंदर, स्वच्छ आणि रुंद प्रवेशद्वार, तेथे वेलींचा विळखा किंवा कुंडीतील आकर्षक फुलझाडं कोणाच्याही मनाला भुरळ घालतात. दरवाजाचा रंग थोडा गडद आणि आकर्षक असावा. > पुढे पहा लिव्हिंग रूमची सजावट
>


यावर अधिक वाचा :