शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

टू इन वन सोफासेट

सोफा खरेदी करताना आपल्याला सर्वात प्रथम तो कशाप्रकारे वापरात आणायचा आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानुसार सोफ्याचा प्रकार निवडणे सोपे होते. ज्यामुळे आपल्याला पैशाची व वेळेची बचत करता येते. तसेच, चांगल्या प्रकारचा सोफा निवडणे सोपे होते. सध्या बाजारात लाकूड, बांबू आणि स्टीलचा सोफा मिळतो. या तीन प्रकारांमध्येही वेगवेगळा दर्जा मिळतो. सोफा खरेदी करताना आपल्यला तो कसा वापरायचा आहे. आपल्या घरात किती सदस्य आहेत याचा तसेच जे त्याचा रोज वापर करणार आहेत याचा विचार हवा. त्यानुसार आपल्याला सोफ्याचा प्रकार निवडायला सोपे जाते. घरांत जास्त सदस्य असतील तर साधारण मोठा व मजबूत बनावटीचा सोफा खरेदी करायला हवा. जास्त जण सोबत असल्यास सर्वांनी त्याची मजबुती तपासावी. लाकडाचा सोफा असेल तर लाकूड कोणत्या दर्जाचे आहे, ते तपासणे गरजेचे आहे. जंगली आणि सागाचे लाकूह यात गफलत करू नका. ज्या ज्या ठिकाणी लाकडाला जोड दिले आहते. त्या जागा बारीक तपासून घ्या. सोफ्याचे चारही बाजूंनी व्यवस्थित निरीक्षण करा. सोफ्याची गादी उचलून त्याखाली बसविलेल्या स्प्रिंगा तपासा. त्यांची हालचाल व्यवस्थित होते की नाही ते पाहा. तसेच सोफा अधिक कडक किंवा अधिक नरम वाटत असेल तर तशी स्प्रिंगची योजना तयार करवून घ्या. आरामदायी बैठकीसाठी सोफ्याची गादी चांगल्या दर्जाची हवी. दिवाणखान्यात सोफासेट पाहुण्यांच्या स्वागतासाठी असतो. सोफासेट निवडताना दिवाणकान्यातील सजावटीकडे लक्ष देऊन त्यानुसार निवड केल्यास तो घरातील इतर फर्निचरसोबत सामावून जातो. यात कापडाची भूमिकाही महत्त्वाची ठरते. आरामदायी सोफ्याची निवड करताना सोफ्याचा लोअर आणि मागचा आधार नीट आहे की नाही हे तपासून तो आपल्याला आरामशीर वाटतो का, हे पाहा. सोफ्याची उंची आपल्याला उठा बसायला त्रासदायक तर वाटत नाही ना, याची खात्री करा. दिवाणखान्यात त्याची साफसफाई करता यावी यासाठी तो सहज उचलत येतो का? त्याचा खालून आपण गादीची सफाई करू शकतो का? हे देखील पाहा. सोफ्याची फेम, त्याची बांधणी व त्यावर दिली जाणारी गॅरंटी याची व्यवस्थित खात्री करा.

सोफा-कम बेड अशा स्वरूपातही सोफा मिळतो. दुहेरी वापर व कमी जागा असा सहज वापरता यावा या दृष्टिने विचार करता सोफा-कम-बेड अतिशय फायदेशीर ठरतो. सोफ्याच्या आतील बाजूने अतिरिक्त जोडलेल्या स्लाइड्‍स योग्य प्रकारे काम करताहेत की नाही, शिवाय ते सहज काढता व बसतवा येतात का, ते पाहा. लाकडाच्या सोफ्यात वेगळाच लक्झरीअस लुक असतो. लाकडाबरोबर आपल्याला स्टीलचा सोफाही फायदेशीर ठरतो. यातही सोफा-कम-बेडचा पर्याय असतो. स्टीलच्या सोफ्याला मजबुती असतेच. तरीही याची जोडणी व्यवस्थित आहे की नाही ते याकडे लक्ष द्या. त्याचबरोबर स्टीलवरचे चंदेरी कोटिंग चंगल्या दर्जाचे व व्यवस्थित आहे की नाही ते पाहा. सध्या स्टीलच्या फर्निचरची नवी फॅशन आहे. हे फर्निचर स्वस्त टिकाऊ आणि दिसायला आकर्षक असते. अनेक प्रकारच्या डिझाईन्स यात सहज उपलब्ध होतात. बांबूचा सोफाही अनेकांना आवडतो. हा सोफा मजबूत असला तरी वरील दोन सोफ्यांच्या प्रकारापेक्षा थोडा कमी दर्जेदार असतो. यात आपल्याला बेडची व्यस्था उपलब्ध नसली तरी हा सोफा आपल्या दिवाणखान्याच्या सौंदर्यात भर टाकतो.