शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

स्तनाचा आकार वाढवण्यासाठी घरगुती सोपे उपाय

प्रत्येक महिलेला तिची काया सुंदर, सुडौल दिसावी असं वाटतं आणि यात स्तानाचा आकाराचा खूप महत्त्व आहे. अनेक महिलांना याबद्दल तक्रार असते की स्तन विकसित होत नाहीये आणि यामुळे आत्मविश्वास कमी होत जातो. इतर काही उपाय केले तर साइड इफेक्ट्सला सामोरं जावं लागत तर येथे आज आम्ही आपल्या काही घरगुती उपाय सांगत आहोत ज्याने स्तानाचा आकार योग्य शेपमध्ये वाढेल आणि यासाठी खूप मेहनत घेण्याची गरज भासणार नाही. 
 
सर्वात आधी तर जाणून घ्या स्तनाचा आकार लहान असण्याचे काय कारणं असू शकतात . 
 
योग्य आहार किंवा पौष्टिक तत्त्वांची कमी
तरुणावस्थेत असंतुलित हार्मोन
वजन कमी असणे
आनुवंशिक
ताणामुळे हार्मोन असंतुलित होणे
औषधांचे साइड इफेक्ट
 
 
आता जाणून घ्या स्तानाचा आकार वाढण्यासाठी घरगुती उपाय ज्याने कुणालाही धोका नाही.
 
मेथीचे तेल
दोन चमचे मेथीचं तेल हातावर घेऊन स्तनांची मालीश करावी. झोपण्यापूर्वी मालीश करणे अधिक योग्य ठरेल. तसेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन कॅप्सूलचे सेवन देखील करता येईल. मेथीमध्ये नैसर्गिक एस्ट्रोजेन आढळतं, ज्याने स्तन विकसित होण्यास मदत मिळते.
 
बडीशेप
एका पॅनमध्ये एक कप पाणी आणि एक चमचा बडीशेप उकळून घ्या. दहा मिनिट उकळून पिण्यायोग्य कोमट झाल्यावर पिऊन घ्या. दिवसातून दोनदा याचे सेवन करू शकता. यात फ्लॅनोनोइड्स आढळतं, ज्यामुळे एस्ट्रोजेन क्रियाकलाप घडतं आणि स्तन विकासामध्ये मदत मिळते.
 
 
व्हिटॅमिन्स
स्तन विकासासाठी व्हिटॅमिन्सचे सेवन सुरक्षित पर्याय आहे. व्हिटॅमिन्स-ए, बी3, सी, आणि ई आरोग्यासाठी लाभकारी असून स्तन विकासासाठी फायदेशीर आहे. 
व्हिटॅमिन-ए, कॉलेजन उत्पादनामध्ये सहायक आहे ज्याने स्तन मजबूत होतात. 
व्हिटॅमिन-बी3, रक्त प्रसार मध्ये सुधार करण्यात मदत करतं ज्याने स्तन विकासात मदत होते. 
व्हिटॅमिन-सी, कॉलेजन स्तन पेशींना हायड्रेटेड ठेवतं. याने शरीरातील हार्मोन संतुलित राहतात.
व्हिटॅमिन-ई कोलेस्टेरॉल स्तर नियंत्रित ठेवून स्तनाचा आकार वाढवण्यात फायदेशीर ठरतं.
 
 
मालीश
स्तनांची मालीश अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठी दररोज 15 ते 20 मिनिटांसाठी स्तनांची मालीश करावी. आपण ऑलिव्ह ऑइल, मेथीचं तेल किंवा सोयाबीन तेलाने मालीश करू शकता.
 
अळशी
अळशीमध्ये आढळणारे पोषक तत्त्व आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यात चमत्कारी तत्त्व लिगनेन आढळतं. अळशीच्या तेलाने स्तनांच्या आकारात वृद्धी होते.
 
सोया उत्पाद 
दिवसातून एक किंवा दोनदा एक-एक कप सोयाबीनच्या दुधाचे सेवन करावे. सोया उत्पादामध्ये आइसोफ्लोन नावाचं फायटोस्ट्रोजनचे उच्च स्तर असल्यामुळे ज्यामुळे हळू-हळू स्तनाचा आकार वाढण्यात मदत मिळते. तसेच आइसोफ्लोनचे सेवन मेनपॉजनंतर स्तन वृद्धीत विशेष परिवर्तन घडवण्यात फारसे उपयोगी नाही. परंतू या पूर्वी स्तन वृद्धीसाठी हे उपयोगी ठरू शकतं.
 
दूध
आपण दुधाचे सेवन करू शकता. यात खूप पोषक तत्त्व आढळतात. गायीच्या दुधात तर एस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन सारखे हार्मोन याव्यतिरिक्त व्हिटॅमिन-डी देखील आढळतं. हे सर्व तत्त्व स्तनांचा आकार वाढवण्यात सहायक ठरतात.