शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

उबदार घर ....

थंडीची चाहलू लागायला सुरुवात झाली आहे. या थंडीच्या दिवसांत वार्‍याची लहानशी झूळकही नकोशी वाटते. स्वेटर, स्कार्फ असे खास ठेवणीतले कपडे बाहेर पडतात. रात्री देखील दुलई ओढल्याशिवाय राहवत नाही. थोडक्यात काय, तरथंडीत अधिकाधिक उबदारपणा कसा मिळेल, याकडे आपलं लक्ष लागलेलं असतं. थंडीतल्या या उबदारपणाला मग घर कसं अपवाद असेल. बाहेरच्या थंडीपासून आपला बचाव करायचा असेल तर तशी वातावरणनिर्मिती आपल्याला घरापासूनच करायला हवी. फरशी, भिंती, छत (सिलिंग) आणि कपडे यात काही लहानसे बदल केलेत तर तुमच्या घराला नक्कीच चांगला, वेगळा आणि उबदार लूक येईल. 

रंग - घराला रंग देणं ही खरं तर खर्चिक बाब आहे. पण तुम्ही या दिवसांत रंगांचं काम करणार असाल तर एखाद्या भिंतीला अग्नीच्या रंगाच्या जवळ जाणारे रंग देण्यास हरकत नाही. सोनेरी, केशरी, लाल हे गडद रंग घराला उबदार अल्याचा फील देतात. आजकाल भिंतीवरील रंगांना विशिष्ट पोत (टेक्श्चर) देण्याच्या फॅशनची खूप चलती आहे. यात टेक्श्चरचे विविध प्रकार आणि शेड्‍स पाहायला मिळतात. रंग देणं शक्य नसेल तर फिक्या रंगाच्या भिंतीवर एखादं गडद रंगाचं पेटिंग लावावं. पेंटिंग बदलूनही चांगला लूक आणू शकता.