शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

चेहर्‍याप्रमाणे निवडा चष्मा

सनग्लासेस असो वा नंबरचा चष्मा, जर फ्रेम चेहर्‍याच्या आकाराप्रमाणे आणि स्किन टोन लक्षात ठेवून निवडण्यात आली तर आपण अधिक स्टाइलिश दिसू शकता.

 
सर्वात आधी आपल्या चेहर्‍याचा शेप ओळखा
 
* केस मागल्या बाजूला करून अरश्यासमोर उभे राहा.
अता मार्करने अरश्यावर आपल्या चेहर्‍याची आउटलाइन बनवा.
अरश्यावर बनलेल्या शेपवरून आपल्याला चेहर्‍याच्या शेपचा अंदाज बांधा.


स्कवेअर
सरळ जबडा आणि कपाळ मोठं असणार्‍यांनी राउंड किंवा ओव्हल ग्लासेस वापरावे. फ्रेमचा रंग गडद असावं. स्कवेअर शेपचा चेहरा असणार्‍यांनी हलक्या रंगाचे फ्रेम वापरू नये.

 

हार्ट
कपाळ मोठं आणि लहान हनुवटी पण गालाचे हाड उंच असणारा चहेरा म्हणजेच हार्ट शेपचा चेहरा. या लोकांनी राउंड किंवा ओव्हल शेपचे ग्लास निवडावे. फ्रेम नाजुक आणि हलक्या रंगाची असावी. या लोकांनी स्टाइलिश किंवा डार्क रंगाची फ्रेम अवॉइड करावी.


ओव्हल
वक्र जबडा पण कपाळापेक्षा थोडा रुंद म्हणजे ओव्हल शेपचा चेहरा. चेहर्‍याचा असा शेप असेल तर स्कवेअर किंवा राउंड शेपची फ्रेम निवडावी. या शेपवर कोणत्याही रंगाची फ्रेम उठून दिसेल. फक्त फ्रेमचा आकार अधिक मोठा नसला पाहिजे.


राउंड
भरलेले गाल, मोठं कपाळ आणि गोलाकार जबडा म्हणजे राउंड शेप चेहरा. या शेपचा चेहरा असणार्‍यांनी स्कवेअर किंवा कोण शेप असलेली फ्रेम निवडायला हवी. लहान, किंवा राउंड फ्रेम्स वापरू नये.


स्किन टोनप्रमाणे फ्रेम....
 
गोरा आणि गव्हाल रंग असलेल्या लोकांनी तपकिरी, रस्ट किंवा ऑलिव्ह ग्रीन रंगाची फ्रेम निवडावी. काळा आणि पांढरा रंग अवॉइड करावा.


 
गुलाबी किंवा सावळ्या रंगाच्या लोकांनी सिल्वर, डार्क, गुलाबी, जांभळा, निळा, आणि ग्रे रंग निवडायला हरकत नाही.