शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

देसीघराला द्या परदेसी लूक

तुमच्यात थोडं प्लॅनिंग आणि क्रिएटिव्हिटी असेल तर तुम्हाला 'देसी घर आणि परदेसी लूक' साकारता येईल.
डेकोरेशनची खासीयत
खिडक्यांची ट्रीटमेंट अगदी साधी आणि सोपी ठेवायला पाहिजे. तसं केल्यानेच घराला प्रायव्हसी आणि उबदारपणा राहील.

कोलोनिअल स्टाइलचं फर्निचर खूप साधं आण ‍रस्टिक लूकमध्ये असतं. अमेरिकेहून स्थलांतरित झालेल्या ब्रिटिशांनी आणलेल्या फर्निचरला सध्या अण्टिक या सदरात धरलं जातं. त्यामुळे ते फर्निचर या थीमसाठी योग्य ठरेल. तुमची रूम अधिक खुलून दिसण्यासाठी फॅब्रिकचा वापर करायला हवा.

डिस्प्लेसाठी हवी फॅन्सी पॉटरी, जिंजर जार, टँकडर्स आणि प्युटर वेअर (जस्ताच्या वस्तू).

रंग माझा वेगळा
या थीमसाठी आपण शक्यतो व्हाइट वॉशचा वापर करणार आहोत. रंग प्लेन आणि साधे हवेत.

वुडवर्कवर क्रीम, ब्राऊन, सॉफ्ट ब्लू अशा रंगांचा टच देता येईल.

या थीमसाठी चेअर रेलिंग इज मस्ट.

पाइन वुडचं फ्लोअरिंग हा उत्तम पर्याय आहे. त्यावर हाताने शिवलेले रग्ज वापरले तर अधिक चांगलं.

या डेकोरेशनमध्ये रस्टिक लाइटिंग छान दिसतं. मेणबत्तीचा वापर केल्यास अधिक चांगला दिसेल.

झुंबर तर हवंच. त्याशिवाय वॉल हॅगिंग्ज आणि वॉल वॉशर्स असतील तर घराला वेगळाच लूक येतो.

कोलोनिअल थीम हायलाइट्‍स
लोकल मटेरियल आणि जवळपास उपलब्ध असणार्‍या गोष्टींची किमया हे या थीमचं वैशिष्ट्‍य.

या घर सजावटीमध्ये रिलॅक्स होणं आणि फ्रेशनेस हे प्रमुख हेतू आहेत.

फॅमिली फोटोंचं कलेक्शन आहे? व्हेरी गुड. तुमचा‍ डिस्प्ले तयार झाला.

साधेपणा हे या थीमचं खरं सौंदर्य.