शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

पाळीबाबत 10 भ्रम

केस धुऊ नये
मुलींना सल्ला दिला जातो की पाळीच्या तीन- चार दिवसात केस धुऊ नये. पण या सल्ल्याचा काहीही आधार नाही. याविपरित त्या दिवसांत गरम पाण्याने अंघोळ केल्याने वेदनांपासून आराम मिळतो.
 
अंघोळ करू नये
हा नियम त्या काळात बनवला गेला असेल जेव्हा घरात मोरी निश्चितच नसेल. त्यामुळे पाळी चालू असताना सार्वजनिक जागी किंवा नदीत अंघोळ केल्याने तिथले पाणी दूषित होऊ नये म्हणून असावा हा नियम. पण आताच्या काळात या दरम्यान अंघोळ न करण्याचा काहीही संबंध नाही. आता तर टेम्पोनं लावून स्विमिंगही करता येऊ शकते.
झाडांना पाणी देऊ नये
चार दिवस स्त्रियांना अगदी अस्पृश्य असल्यासारखं वागवलं जातं. या दिवसात झाडांना पाणी देण्याने काहीही बिघडणार नाही. कोणतेही झाड यामुळे मुरगळणार नाही.
 

लोणच्याला हात लावू नये
हे फक्त भीती दाखवण्यासाठी तयार केलेला नियम आहे. सरळ कोणी ऐकतं नाही म्हणून या दिवसात लोणच्या हात लावू नये असे म्हणतं होते. खरं म्हणजे या दिवसात हार्मोन अधिक सक्रिय असतात म्हणून मसालेदार आहार घेतल्याने संतुलन बिघडतं. परंतू आता हे नियम पाळतं तरी कोण?
पापडापासून दूर राहा
आपल्या हात लावल्याने पापडाचा रंग बदलतोय आहे का हा प्रयोग करूनच पाहून घ्या.
 
सेक्स मुळीच नाही
पाळीदरम्यान शरीर कमजोर होऊन जातं म्हणून जास्त आरामाची गरज असते. आधी चार दिवसात स्त्रियांना हा बहाण्याचे का नसो पण आराम मिळायचा. पण या दरम्यान सेक्स करण्यात काहीच हरकत नाही. जेव्हा की याच काळात सेक्सचा अधिक आनंद मिळू शकतो.

स्वयंपाकघरात प्रवेश नाही
संयुक्त कुटुंबांमध्ये आजही नियम लागू आहे. परंतु जिथे केवळ एकच स्त्री असते तिथे हे नियम शिथिल पडतात. जेव्हा लहान कुटुंबात सर्व धकतं तर मोठ्या कुटुंबात अनर्थ कसा होईल यावर विचार केला पाहिजे.
 
घरातून बाहेर
या अंधश्रद्धेमुळे स्त्रियांना आपल्या बिछान्यावर तर काय आपल्या खोलीतदेखील झोपण्याची परवानगी नसते. यामागील एक कारण केवळ हे असू शकतं की गादीवर डाग लागायला नको, या व्यतिरिक्त काही नाही.
मंदिरात प्रवेश, अरे देवा!
पहिल्यांदा पाळी सुरू होत्याक्षणी मुलींना ही शिकवणूक दिली जाते की या दरम्याने कोणत्याही मंदिरात प्रवेश करू नये. पण भारतात अनेक धर्म असेही आहेत ज्यात पाळीदरम्यान देवाचं नाव घेयला आणि पूजास्थळी जाऊन देवपूजा करण्यावर कुणालाही रोख नाही. एवढंच नव्हे तर हिंदू धर्मातही काही जातींमध्ये मुलीची पहिल्यांदा पाळी आली की तिचे पूजन केलं जातात. तर काही ठिकाणी लग्नानंतर स्त्रीला पहिल्यांदा पाळी आली की तिचं खूप कौतुक केलं जातं.