testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सेन्सेक्समध्ये 1,150 अंकांची घसरण आल्याने शेअर बाजार गडगडला

मुंबई| Last Updated: सोमवार, 24 ऑगस्ट 2015 (13:20 IST)
जागतिक बाजारात जोरदार घसरण झाल्याच्या परिणामी भारतीय शेअर बाजारही चांगलाच गडगडला असून
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा निर्देशांक 1,150 अंकांनी खाली घसरला आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक बाजारात जोरदार घसरण झाल्याच्या परिणामी भारतीय शेअर बाजारही चांगलाच गडगडला आहे. तर राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकांतही २७५ पेक्षा अधिक अंकांची घसरण होऊन तो ८००० हून खाली घसरला. गेल्या ३ वर्षांतील शेअर बाजाराचा नीचांक आहे. चीनी चलनाचे झालेले अवमूल्यन हे या घसरणीमागचे मोठं कारण मानले जात आहे.
दरम्यान याचा परिणाम रुपयाच्या किंमतीवरही झाला असून एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 66.67 इतकी झाली आहे. गेल्या दोन वर्षांतील हा सर्वात नीचांकी दर ठरला आहे.

येस बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक व गेलच्या शेअर्समध्येही घट झालेली दिसत आहे.


यावर अधिक वाचा :